मुंबई | अरबी समुद्रात मालदीव आणि कोमोरीन भागासह, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत लवकरच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 4 दिवस कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पुढील 4 दिवस राज्यातदेखील विविध भागात पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, पुढील 2 दिवस उत्तर, पूर्व भारतातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात केवळ ब्रह्मपुरी येथे 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 42 अंशांच्या खाली घसरला आहे.
मे महिन्यातही राज्यात उष्ण लाट कायम होती. गेल्या काही दिवसांपासून उष्ण लाट ओसरली असून अद्यापही अनेक भागांत उन्हाचा चटका कायम आहे.
हवामान विभागाच्या मते राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते अरबी समुद्राच्या उत्तर पूर्व भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याशिवाय उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत हवेच्या वरच्या थरात चक्रीय पट्टा तयार झाला आहे.
यामुळे मान्सूनपूर्व पावसाची परिस्थिती तयार झाल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण होत असल्याने मान्सून दोन दिवस उशिरा महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगितलं गेलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“बारामतीचा गडी एवढा हुशार कसा?, मला वाटतं की हा ब्रह्मदेवाला चुकवून…”
कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांची प्रकृती बिघडली!
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं; मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होताच केली हकालपट्टी
‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला केएल राहुल
“शरद पवार मला भेटले तर मी त्यांच्या पायाही पडेन”