नवी दिल्ली | सध्याच्या कडक उन्हाळ्यामुळे अंगाची लाही लाही होताना पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पारा चाळीशीच्या पुढे गेल्याने घरातून बाहेर निघणं अवघड झालं आहे.
अशातच आता हवामान विभागाने पुढील 5 दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
सदरील राज्यातील अनेक भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर दक्षिणेकडील राज्यात देखील वादळ आणिप पावसाची शक्यता सांगितली आहे.
उन्हाळ्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम भारतातील हवामानावर होत असतो. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता असते. त्याचाच परिणाम आता होताना दिसत आहे.
उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेचा तडाखा कायम राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह, छत्तीसगड आणि मध्यवर्ती राज्यांना कडक उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
“राज ठाकरे आता उद्धव ठाकरेंची जागा घेणार”
‘आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत’; राज ठाकरेंचा इशारा
सरकारची भन्नाट योजना, निवृत्तीनंतर दर महिन्याला मिळतील ‘इतके’ हजार रुपये
“देशातील वातावरण ठरवून बिघडवण्याचा प्रयत्न होतोय”
दिल्लीमध्ये दगडफेकीनंतर हाय अलर्ट; अरविंद केजरीवालांनी उचललं मोठं पाऊल