पुढचे दोन दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | संपूर्ण कोकण , मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. आज दिवसभरात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा (Heavy rains) देण्यात आला आहे.

आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्व ठिकाणी पावसाची (Rain) शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

आजपासून राज्यात आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.

जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, ठाणे, मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याचवेळी थायलंड परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागर आणि अंदमान समुद्रात आले असून त्याचे येत्या दोन दिवसात चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. ते चक्रीवादळ 4 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत धडकण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के. ए. होसाळीकर यांनी राज्यात पुढील तीन ते चार तासात काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.

यामध्ये रायगड, ठाणे, मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि नाशिकमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

दरम्यान, हा अवकाळी पाऊस ज्वारी आणि गहू या पिकांसाठी उपयुक्त आहे. काजू, द्राक्षे व आंब्याला बुरशीजन्य रोगांची लागण होण्याची शक्यता असून, तज्ज्ञांच्या सल्ल्याने शेतकऱ्यांनी पिकांवर बुरशीनाशकांची फवारणी करावी, असं आवाहन कृषी खात्याने शेतकऱ्यांना केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन 

“2024 च्या निवडणुकीत काँग्रेसला 300 जागा मिळतील असं…” 

प्रचंड मेहनत करुनही करिअरमध्ये यश मिळत नाहीये?, मग करा हे उपाय 

ओमिक्रॉनचा प्रसार आणखी वाढणार?; WHO ने दिलेल्या माहितीने जगाचं टेंशन वाढलं

चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी