महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; आज दिवसभरात आढळले इतके रूग्ण!

मुंबई | मागील काही दिवसांपासून देशातील तज्ज्ञांनी देशात लवकर कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आता भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसत आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना निर्बंध कडक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकार आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांमध्ये सातत्यानं कोरोना रूग्णसंख्येचा आकडा वाढत चालला आहे.

अशातच आता मागील काही दिवसांपासून राज्याच्या आकडेवारीत अचानक वाढ झाल्याचं दिसत होत. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत असल्यानं आता आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आज तब्बल 34 हजार 424 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 18,967 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील  कोरोना परिस्थिती सध्या गंभीर बनत चालली आहे. सरकारकडून विविध क्षेत्रांवर निर्बंध लावण्यात येत आहेत.

जानेवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच राज्यातील नवीन रूग्णसंख्या 10 हजारांच्या पुढं होती. अशातच नवी रुग्णसंख्या 40 हजारांच्या पुढं गेली आहे. त्यामुळे राज्य सरकारची चिंता देखील वाढली आहे.

गेल्या 3 दिवसांमध्ये राज्यातील नवीन रूग्णसंख्या ही काही पटींनी वाढल्याचं पहायला मिळतंय. तर राजधानी मुंबईमध्ये देखील कोरोना हातपाय पसरत असल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत 11 हजार 647 नव्या रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे आता मुंबईत लाॅकडाऊन लागण्याची शक्यता आहे. अशात सरकारकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

 “महाविकास आघाडीचं डोकं ठिकाणावर आहे का?”

 भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी मैदानात; केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

 “शरद पवारांची कुणाला अ‍ॅलर्जी असण्याचं काम नाही”

मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये दाखल 

मोठी बातमी! रेस्टॉरन्ट, बार, खासगी कार्यालये आजपासून बंद