धक्कादायक! मोठ्या भावाने समोसा खाल्ला म्हणून लहान भावाने उचलले ‘हे’ पाऊल

नागपूर | घरात लहान भावंडांमध्ये वाद हा होतच असतो. भावंडांमध्ये वाद होणे हे काय नवीन नाही. मात्र, मोठ्या भावाने समोसा खाल्ल्यामुळे लहान भावाने आत्महत्या केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील गिट्टीखदान परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नत्थू साहू हे पत्नी व आपल्या दोन मुलांसोबत गंगानगर काटोल रोडवर राहतात. त्यांचा मोठा मुलगा धीरज (वय 13) आठवीत शिकतो. तर, लहान मुलगा वीरू(वय 11) पाचवीत शिकत होता. नत्थू साहू हे भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

साहू यांचा मोठा मुलगा धीरज याने बाहेरून एक सामोसा खाण्यासाठी घरी आणला होता. लहान भावाने समोसा खाण्यासाठी हट्ट करूनही धिरजने त्याला समोसा दिला नाही. याचा राग लहान भावाला आला. वीरू रागाच्या भरात आपल्याच घराच्या आतल्या खोलीत गेला आणि आतून दरवाजा लावला. यावेळी घरातील सर्वजण घराबाहेर बसले होते.

अर्धा तास उलटून गेला तरी वीरू बाहेर न आल्याने आईने दरवाजा ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद न मिळाल्याने खिडकीतून बघितले असता लहान वीरूने छताच्या रॉडला साडीने गळफास लावलेला दिसला. 11 वर्षाच्या चिमुकल्याने आत्महत्त्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडी सरकारला सुरुंग लावण्याचे प्रयत्न; ‘या’ महिन्यात होणार सत्तापालट?

नरेंद्र मोदींनी ‘या’ मराठी माणसावर दाखवला विश्वास; सुपूर्द केली ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी

जिच्यासोबत बहिण म्हणून काम केलं, तिच्यासोबतच ‘या’ अभिनेत्यानं लग्न केलं!

धक्कादायक! मांत्रिकाने चक्क मुलीच्या कुटुंबियांसमोर केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

केरळनंतर राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा; उंटासोबत केलं काळजाचा थरकाप उडवणारं कृत्य