सोशल मिडीयावर सध्या आपल्याला अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यामध्ये डान्सचे, गाणं गायल्याचे तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले दिसत असतात. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने मागिल वर्षी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केलं होतं.
तेव्हापासून ऑनलाईन मिटींग्स घेण्याला अधिक प्राधान्य दिलं जातं. त्याचप्रमाणे झूम अॅपव्दारे शाळा, कॉलेजचे सर्व लेक्चर्स ऑनलाईन पद्धतीने घेतले जात आहे.
या दरम्यान काहीकाहीवेळा मिटींग सुरु असताना बऱ्याच जणांचे कॅमेरा सुरु असल्याचं लक्षात न आल्यामुळे अनेकांची फजीती झाली आहे. त्यासंदर्भातील व्हिडीओही या पूर्वी व्हायरल झाले आहेत. अशातच ऑनलाईन क्लासदरम्यान एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
डेली मेलच्या एका बातमीनुसार, ही घटना कोलंबियामधील कॅथोलिक शाळेची आहे. या शाळेतील एक शिक्षक ऑनलाईन लेक्चर घेतल्यानंतर आपला कॅमेरा बंद करायला विसरला. त्यानंतर त्या शिक्षकाची पत्नी त्याच्या जवळ आली.
त्यादरम्यान शिक्षक आपल्या पत्नीसोबत रोमान्स करत असाताना दिसला. त्यानंतर त्याने स्क्रिनकडे पाहिले असता, त्या शिक्षकाच्या लक्षात आलं की आपण कॅमेरा बंद करायला विसरलो. तातडीने त्या शिक्षकानी आपला कॅमेरा बंद केला. मात्र तोपर्यंत ही घटना व्हायरल झाली होती.
आपल्याकडून चूक झाली असल्याचं शिक्षकाच्या लक्षात आलं. त्यानंतर शिक्षकाने सर्वांची माफी मागितली. त्यावेळी ते म्हणाले की, माझी चूक झाली. क्लास संपल्यानंतर कॅमेरा सुरू राहिला असल्याचं माझ्या लक्षात आलं नाही. मी हे जाणून-बुजून केलेलं नाही. या चुकीसाठी मी माफी मागतो.
दरम्यान, कॅथोलिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी या घटनेचा आणखीन तपास सुरू केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की, ही एक गंभीर घटना आहे.
महत्वाच्या बातम्या-
डॉक्टरचा ‘हा’ फोटो होतोय सोशल मीडियावर तूफान…
कौतुकास्पद! बायकोचे दागिने विकून पठ्ठ्यानं रिक्षाला बनवलं…
कोरोना योद्धाला सलाम! कोरोनाने आई, वडिल, भावाचा मृत्यू तरीही…