जगातील एकमेव देश, जिथे गेल्या 100 दिवसांत एकही कोरोना रुग्ण सापडला नाही!

वेलिंग्टन | गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोना महमारीनं संपुर्ण जगात थैमान घातलं आहे. सर्वच देश या महामारीशी संपूर्ण ताकदीनिशी लढत आहे. अशातच न्यूझीलंड या देशानं सर्व जगासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. न्यूझीलंडमध्ये गेल्या 100 दिवसांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

न्यूझीलंड या देशातील महिला पंतप्रधानांनी नागरिकांना विश्वासात घेत लॉकडाऊनमध्ये कडक नियम आखले. नागरिकांनीही सरकारला संपूर्ण सहाय्य केलं. यामुळे या देशात कोरोनाबाधितांची संख्या केवळ 1500 तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 22 आहे.

लेडीज पंतप्रधान जसिंदा अर्डर्न यांनी केलेल्या या अद्वितीय कामगिरीमुळे संपूर्ण जगातून त्यांचं कौतुक केलं जात आहे. न्यूझीलंडमध्ये आंतराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्यानं परदेशातून परतताना प्रवाशांना सीमेलगतच क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येतं आहे.

‘युनिव्हर्सिटी ऑफ ओटागो’ मधील महासाथीचे तज्ज्ञ प्रोफेसर मायकल बेकर, न्यूझीलंडच्या या यशाविषयी बोलताना म्हणतात, “हे फक्त विज्ञानाचा योग्य वापर आणि चांगल्या राजकीय नेतृत्वामुळे शक्य झालं आहे.”

महत्वाच्या बातम्या-

“जेव्हा जेव्हा देश भावुक झाला, तेव्हा तेव्हा महत्त्वाच्या फाईल्स गायब झाल्या”

मृत कोरोनाग्रस्ताला कुटुंबाने वाऱ्यावर सोडलं; तृतीयपंथियांसह-नागरिकांनी घालून दिला आदर्श

दिशा सॅलियन आणि सुशांतचं नातं काय?; मुंबई पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा

तुझ्या शरीराचं ते अंग दाखव; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीकडे झाली होती मागणी

पत्नीनं मारहाण केल्याचा आरोप; चक्क पोलिसानंच पोलीस ठाण्यात दिली तक्रार