भाजप सरकारने शरद पवार यांच्यावर सोपवली अतिशय महत्त्वाची जबाबदारी!

नवी दिल्ली | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये नुकताच नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावेळी शपथ घेतली. भारत चीन मधील तणाव वाढत चाललेला असताना आता शरद पवार यांच्यावर भाजप सरकारकडून अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पवार यांना संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून निवडण्यात आलं आहे.

शरद पवार यांनी यापूर्वी केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणून काम बजावलं आहे. पवारांचा हा अनुभव लक्षात घेऊनच भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं बोललं जात आहे.

गलवान खोऱ्यामध्ये भारत चीन सैन्याच्या झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. यावेळी विरोधी पक्षनेत्यांनी मोदी सरकार विरुद्ध टीकेचे शस्त्र उपसले होते. मात्र, शरद पवार यांनी त्यावेळी संरक्षण करारांचा दाखला देत सरकारवर थेट टीका करणं टाळलं होतं.

शरद पवार यांच्याबरोबरच भाजप सरकारने नवनिर्वाचित खासदारांपैकी भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्यावरही कोरोनाकाळात महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. सहस्त्रबुद्धे यांना मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर चेअरमन म्हणून नेमण्यात आलं आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ही जबाबदारी सध्या महत्वाची ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक, सुशांतसिंग राजपुतच्या नावाने सुसाईट नोट लिहून ‘ती’ने केली आत्महत्त्या !

‘मी आता बसलेलोच आहे, माझी मुलाखत सुरू असतानाच माझे सरकार पाडा’

कोव्हीड योद्ध्यांवर पुन्हा जमावाकडून जीवघेणा हल्ला!

दहा दिवसांचं लॉकडाऊन संपलं, पुणेकरांसाठी पुढील नियम कोणते?

प्रियंका आणि दीपिकाही ‘या’ गुन्ह्यात असल्याची शक्यता; मुंबई पोलीस करणार चौकशी