अन् भर मैदानात पांड्या बंधू एकमेकांवर संतापले, पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या सर्वत्रच आयपीएलची चर्चा चालू आहे. मुंबई इंडिअन्सचा संघ आयपीएल 2020 मध्ये सुरुवाती पासूनच उत्तम प्रदर्शन करत आहे. मुंबई इंडिअन्स संघातील पांड्या ब्रदर्स यावेळच्या आयपीएलमध्ये जबरदस्त खेळी खेळत आहेत. हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या मुंबई इंडिअन्सच्या संघासाठी खेळत संघाच्या यशात मोलाचा हातभार लावत आहेत.

11 ऑक्टोबरला दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडीअन्स यांच्या दरम्यान सामना खेळला गेला होता. दिल्लीच्या संघावर मात करत मुंबईनं हा सामना आपल्या नावावर करून घेतला होता. मात्र, या सामन्यादरम्यान कुणाल पांड्याची अग्रेसिव्ह साईड देखील पाहायला मिळाली होती.

दिल्ली विरुद्ध झालेल्या या सामन्यात पांड्या बंधू एकमेकांवर संतापल्याचं पाहायला मिळालं होतं. 11 ऑक्टोबरला हार्दिक पांड्याचा जन्मदिवस देखील होता. मात्र, या मॅचमध्ये ऑल राउंडर हार्दिक पांड्या जास्त कमाल दाखवू शकला नव्हता.

पहिल्या इनिंगच्या वेळी देखील हार्दिक पांड्याकडून मिस फिल्ड झाली होती. यावेळी हार्दिकचा भाऊ कुणालच बॉलिंग करत होता. मात्र, हार्दिकच्या ओव्हर थ्रोमुळे फलंदाजी करणारा खेळाडू धावबाद होऊ शकला नाही. यामुळे कुणाल पांड्या भर मैदानात हार्दिकवर संतापला होता.

काही वेळानं मैदानावर सर्व काही ठीक झालं आणि मुंबईच्या संघानं उत्तम प्रदर्शन करत या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्ली विरुध्द पाच गडी राखत विजय मिळवला होता. दिल्ली विरुद्धच्या या सामन्यानंतर मुंबई इंडिअन्सची टीम पॉईंट्स टेबलमध्ये एक नंबरला पोहचली आहे.

या सामन्यात कुणाल पांड्यानं अतिशय उत्तम खेळी खेळली होती. कुणालनं मुंबई संघासाठी सर्वात जास्त विकेट घेतल्या होत्या. कुणालनं 4 ओव्हर मध्ये 26 रन देत 2 विकेट घेतल्या होत्या.

दरम्यान,हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या सतत चर्चेत असतात. एकीकडे त्यांची उत्तम खेळी प्रेक्षकांची मनं जिंकते तर दुसरीकडे या दोघांचा स्वॅग चाहत्यांना आकर्षित करतो. हार्दिक आणि कुणाल हे बंधू मुंबई इंडिअन्सच्या संघासाठी राम लखन आहेत.

दिल्ली कॅपिटल्स विरुध्द झालेल्या या सामन्यात कुणाल पांड्या नवीन लूकमध्ये दिसला होता. कुणाल या सामन्यात क्लीन शेव करून आला होता. कुणालचा हा नवीन लूक चाहत्यांना चांगलाच आवडला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

फोनवर कोरोना व्हायरस किती दिवस जिवंत राहतो?, आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक खुलासा