चेन्नई| सध्या जिकडे तिकडे आयपीएलचीच चर्चा सुरु आहे. आयपीएल स्पर्धेच्या 14 व्या सिझनला सुरुवात झाली असून स्पर्धेतील 11 सामने झाले आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्समधील पांड्या बंधुंची जशी मैदानात चर्चा असते तशीच सोशल मीडियातही दोघं स्टार आहेत. अशातच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या हे त्यांच्या पत्नीसोबत आहेत. आयपीएल स्पर्धेत मैदानात जबरदस्त खेळ करण्यासोबतच कुटुंबासोबत धमालही करत आहेत. आता हार्दिकनं असाच एक धमाल व्हिडीओ पोस्ट केलाय. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक, कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी पंखुडी शर्मा असे चौघंही डान्स करत असतानाचा व्हिडीओ हार्दिकनं शेअर केला आहे.
हार्दिक पांड्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक रील शेअर केलं आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिकशिवाय त्यांची पत्नी नताशा भाऊ कृणाल पंड्या आणि पंखुडी शर्मा हॉटेलच्या बागेत डान्स करताना दिसत आहेत. पांड्या ब्रदर्सने नारंगी रंगाचे टी-शर्ट घातले आहेत. तर नताशा नेव्ही ब्लू आणि पंखुडीने स्काय ब्लू टॉपमध्ये डान्स करताना दिसत आहे. हे चौघं जस्टीन बीबरच्या गाण्यावर डान्स करत आहेत.
नताशानं या डान्सचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून त्याला ‘द पांड्या स्वॅग’ असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये पांड्या ब्रदर्श, नताशा आणि पंखुडी यांनी एक सारखे कपडे घातले आहेत. तसंच चौघांच्याही शर्टवर स्माईलीचा फोटो आहे. हे चौघंही एकसारखा डान्स करत आहेत.
पांड्या बंधूंच्या डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून खूप लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. नताशा आणि कृणालने आपल्या इन्स्टावर त्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत.
हार्दिक पांड्या त्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे चर्चेत असतोच परंतु त्याच्या पत्नीसोबतच्या अनेक रोमँटिक फोटोंमुळेही तो अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतो.
हार्दिकची पत्नी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. क्षणाक्षणाची माहिती ती आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे देत असते. कधी तिचे एकटीचे तर कधी हार्दिकसोबतचे, तर कधी बेबी अगस्त्यसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंमधून तिची हार्दिकबरोबरची रोमँटिक केमिस्ट्री नेहमीच दिसून येत येते.
दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या तिसऱ्या सामन्यात हार्दिक पांड्याची अफलातून फिल्डिंग सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या विजयात निर्णायक ठरली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
IPL 2021: चेन्नई सुपर किंग्स संघाचा दणदणीत विजय, राजस्थान…
सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, वाचा काय आहेत…
सायली संजीवचा ‘हा’ व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर…
‘मुंबईत लोकांचा मृत्यू होतोय आणि इथे आयपीएल खेळवली…