चालत्या बसमध्ये बस ड्रायव्हरला फीट आली, महिलेने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक

पुणे | पुण्यातील एक महिला बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Pune) व्हायरल झाला. महिलांचा ग्रुप पर्यटन करत असताना बस चालकाला अचानक फिट आली.

अशा वेळी योगिता सातव (Yogita Satav) यांनी धीराने बसचे स्टिअरिंग हाती घेतलं आणि अनियंत्रित होऊ शकणारी बस तर ताब्यात घेतलीच, शिवाय बस चालकालाही रुग्णालयात दाखल केलं आहे.

40 वर्षीय चालकाला ड्रायव्हिंग करताना चक्कर आल्यानंतर बसमधील महिलेनेच स्टिअरिंग व्हिल हातात घेत बस चालवली आणि चालकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं.

जवळपास 10 किलोमीटर पर्यंतचा प्रवास त्यांनी केला. वाघोली येथील योगिता सातव यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे चालकासह प्रवासी महिलांचेही प्राण वाचले.

वाघोली येथील महिलांचा ग्रुप बसने मोराची चिंचोळी येथे पर्यटनासाठी निघाला होता. यावेळी बस ड्रायव्हरला गाडी चालवत असताना फिट येत असल्याचं आयोजक महिलेच्या लक्षात आलं.

चालकाने गाडी बाजुला थांबवली आणि तो अक्षरशः कोसळलाच. अशा परिस्थिती गाडी कोण चालवणार, हा मोठा प्रश्न सर्व महिलांसमोर होता.

फिट आलेल्या चालकाला त्यांनी उपचारासाठी नेले आणि महिलांना वाहन चालवत इच्छित स्थळी पोहचवले. त्यांचा बस चालवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

पुरूषांसाठी अत्यंत महत्वाची माहिती; ‘या’ अवयवावर होतोय कोरोनाचा परिणाम 

“दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?, कृपा करून…” 

पेट्रोल-डिझेलसाठी आता मोजावी लागणार ‘एवढी’ किंमत, वाचा आजचे ताजे दर 

राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता 

वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय