महाराष्ट्राच्या जनतेला फडणवीस नकोच होते; शिवसेनेचा फडणवीसांवर घणाघात

मुंबई | बहुमताच्या आसपासही जाता  येणं शक्य नसताना दिल्लीने फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली. वास्तविक  महाराष्ट्राच्या जनतेला फडणवीस नकोच होते, असा घणाघात शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर केला आहे.

मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान यांच्या भाजप सरकारचा पराभव झाला तेथेही बलाढ्य मानले गेलेले शिवराजसिॆंह चौहान हे विरोधी पक्षनेते बनले नाहीत. पक्षातील अन्य नेत्यांनी ते पद स्विकारलं. मात्र महाराष्ट्रात दिल्लीवाले फडणवीस एके फडणवीस करत आहेत यामागचं  रहस्य काय आहे ते समजून घ्यावं लागेल, अशा शब्दात शिवसेनेनं फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ज्या चुका केल्या त्या निदान विरोधी पक्षनेते म्हणून तरी करू नयेत. विरोधी पक्षनेतेपदाची शान आणि प्रतिष्ठा राहावी अशी आमची इच्छा आहे. कुणाला विरोधी पक्षनेता करायचं किंवा कोणाला आणखी काय करायचं  हा भाजपचा अंतर्गत मामला आहे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून शिवसेनेनं भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

महत्वाच्या बातम्या-