सामन्यात पराभव पत्कारूनही धोनीनं विरोधी टीमच्या खेळाडूला दिलं ‘हे’ गिफ्ट; वाचा काय आहे यामागील कारण

नवी दिल्ली | 2020च्या आयपीएल मोसमातील 37वा सामना अबु धाबीतील शेख जाएड स्टेडिअममध्ये खेळला गेला. हा सामना राजस्थान रॉयल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला.

या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल संघाच्या जोस बटलर याने जोरदार फटकेबाजी केली. त्याच्या नाबाद खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल संघाने विजयी वाटचाल केली. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने 125 धावा केल्या होत्या. जेव्हा राजस्थान रॉयलने 28 धावांवर तीन बळी गमावले, तेव्हा सीएसकेला थोडी का होईना विजयाची चुणूक लागली होती. मात्र, त्यांची ही इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही.

राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांनी मैदानात कमालच केली. या जोडीने 98 धावांची भागीदारी करत संघाला विजयी केले.

या जोडीने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. या दरम्यान त्यांचा स्ट्राईक रेट 145.83 होता. या मोसमातील बटलर याचे हे दुसरे अर्धशतक होते. शानदार फटकेबाजी करत बटलर याला या सामन्यासाठी प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवडले गेले.

यानंतर चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने जोस बटलर याला एक खास भेटवस्तू दिली. धोनी हा २००वा आयपीएल सामना खेळत होता. मात्र, या सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला.

मग धोनीने जोस बटलरला आपले टी-शर्ट भेट दिले. जोस बटलर याने ही माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. त्या फोटोत त्याच्या हातात धोनी याचा टी-शर्ट दिसत आहे. मात्र, या मोसमात धोनी याची आधीसारखा खेळी आणि जोरदार फटकेबाजी काही दिसली नाही.

दरम्यान, महेंद्र सिंह धोनी याला त्याच्या 200व्या सामन्याच्या स्वतःच्या विक्रमाबद्दल काहीच माहित नव्हते. जेव्हा तो या सामन्यासाठी नाणेफेक करायला गेला तेव्हा नाणेफेक प्रस्तुतकर्ते आणि माजी क्रिकेटर डॅनी मॉरिसन यांनी धोनीला २०० व्या सामन्याबद्दल विचारले. तेव्हा धोनी याला त्याचा हा विक्रम माहित झाला. आयपीएलचे सर्वात जास्त २०० सामने खेळणारा महेंद्र सिंह धोनी हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघ या सिझनमध्ये आत्तापर्यंत एकूण १० सामने खेळला आहे. त्यापैकी ते फक्त ३ सामने जिंकले आहेत. सध्या सीएसके प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी जर सीएसके प्ले ऑफमध्ये पोहोचली नाही तर पहिल्यांदाच असे घडेल की, सीएसके प्ले ऑफमध्ये पोहोचली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला आणखी मोठा धक्का! खडसेंनंतर आता भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याही राष्ट्रवादीत जाणार

काय सांगता! बिस्किटांची चव ओळखण्यासाठी ‘ही’ कंपनी देतेय तब्बल 40 लाख रुपये

माणसातील माणुसकी ओळखण्यासाठी ‘या’ 9 गोष्टी ठरतील खूप उपयुक्त! नक्की वाचा

‘…तर मी एका मिनिटात राजकारण सोडेल’; राष्ट्रवादी प्रवेशापूर्वीच खडसेंच्या राजकारण सोडण्याच्या वक्तव्यानं समर्थक हैराण!

महेंद्रसिंग धोनीनं स्वतःच्याच नकळत आयपीएलमध्ये रचला नवीन विक्रम!