Top news महाराष्ट्र सोलापूर

पोलिसांना विनाकारण वाहन अडवण्याचा नाही अधिकार, असे घडल्यास ‘या’ क्रमांकावर दाखल करा तक्रार

सोलापूर | वाहतूक पोलिसांनी विनाकारण गाडी अडवल्याच्या घटना आपण नेहमीच बघत असतो. त्यामुळे अनेकदा वाहन चालक आणि वाहतूक पोलिस यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. चौकाचौकांमध्ये पोलिस उभं राहून गाड्या अडवताना आपल्याला दिसून येतात. गाडी अडवल्यानंतर वेगवेगळ्या कागदपञांची संबंधित पोलिस मागणी करतात आणि दिलेल्या कागदपञांमध्ये ञुटी शोधायला सुरुवात करतात.

अशातच जनतेला मोठ्या मानसिक ञास आणि भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलिस विनाकारण कोणतेही वाहन अडवू शकत नाही, तसे केल्यास पोलिसांवर कडक का.रवाई करण्यात येईल. असा नवीन आदेश सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काढला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक का.रवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

विनाकारण गाडी थांबवून ञास देणाऱ्या पोलिसाला अधीक्षकांनी चांगलचं सुनावलं आहे. जर विनाकारण कोणी वाहन थांबवलं तर त्याच्यावर कडक का.रवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय महामार्ग किंवा राज्य महामार्गांवर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर का.रवाई करावी. नाकाबंदी करताना संबंधित पोलिस स्टेशन हद्दीमधील पोलिस ठाण्यात नोंदणी करून कंट्रोल रुमला त्याची माहिती देणे यापुढे बंधणकारक असणार आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलिस अमलदार विनाकारण कोणत्याही गाडीला अडवून ञास देत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे येत होत्या. त्यामुळे  विनाकारण कोणत्या वाहनाला थांबवायचं असल्यास कंट्रोल रुमची परवानगी घेणं देखील बंधनकारक केलं आहे. पोलिस अमलदारच्या या गै.रवागणूकीमुळे हे पाऊल उचललं असल्याच तेजस्वी सातपुते यानी सांगितलं आहे.

परराज्यातील वाहने, दुचाकी, चारचाकी यांना जर पोलिसांनकडून विनाकारण काही ञास होत असेल, तर त्यांनी खालील दिलेल्या क्रमांकावर आपली तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जनतेला केले आहे. तसेच व्हॉट्सअप क्रमांकावरही फोटोद्वारे तक्रार नोंदविता येणार आहे.

तक्रार क्रमांक- 0217-2732000 , 0217-2732009

व्हॉट्सअप क्रमांक- 7264885901 , 7264885902

काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांमुळे पोलिस विभाग हा संपूर्ण बदनाम होत आहे, त्यामुळे ही अंमलबजावणी गरजेची असल्याच अधीक्षकांनी सांगितलं आहे. वरील संबंधित क्रमांकावर संपर्क केल्यानंतर त.क्रारीमध्ये काही तथ्य आढळल्यास कडक का.रवाई केली जाईल, असं तेजस्वी सातपुते यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना अजिबात सोडण्यात येऊ नये आणि कायदेशीर कडक का.रवाई करावी असे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले आहेत.

सोलापूर पोलिस आता स्वत: खोटा चालक पाठवून संबंधित पोलिसांची उलट तपासणी करणार आहेत. त्यामुळे आता पोलिसी खाक्या दाखवून जनतेची लू.ट करणाऱ्यांची खैर नाही, असं तेजस्वी सातपुते यांनी म्हणलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

साताऱ्यात ‘या’ ठिकाणी आढळतंय चक्क विहीरींमध्ये पेट्रोल, अनेक विहीरी पेट्रोलने गच्च! पाहा व्हिडीओ

‘माझ्या स्तनांची सर्जरी करण्यास सांगितलं अन्…’; दिपिकाचा धक्कादायक गाैप्यस्फोट!

मोठी बातमी! बाॅलिवूडवर इन्कम टॅक्सची धाड, ‘या’ बड्या कलाकारांवर होणार कारवाई

बिकनी शूटसाठी चक्क दोन दिवस उपाशी, ‘या’ अभिनेत्रीचा अजब खुलासा…

श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त वडिल शक्ति कपूर झाले भावूक, म्हणाले…