Top news मनोरंजन

मनोरंजन विश्वातल्या ‘या’ लोकप्रिय जोडीनं अखेर घटस्फोट घेतला

मुंबई | मनोरंजन विश्वातले अनेक सेलेब्रिटी अलीकडे लग्नाच्या बंधनात अडकून आपल्या नविन जिवनाची सुरुवात करत आहेत. मात्र, अशातच आता मनोरंजन विश्वातल्या एका लोकप्रिय सेलेब्रिटी जोडप्यामध्ये कायमचा दुरावा आला आहे. अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या रणवीर शौरी आणि कोंकणा सेन शर्मा या जोडप्याला अधिकृतपणे घटस्फोट मिळाला आहे.

कोंकणा आणि रणवीर यांच्यात 2007 मध्ये डेटिंग सुरू झालं होतं. त्यानंतर हे दोघेजण 2010 मध्ये विवाह बंधनात अडकले होते. या दोघांना आठ वर्षाचा एक मुलगा आहे.

या दोघांमध्ये सतत भांडण होत होती. त्यामुळे, समुपदेशनाच्या माध्यमातून अनेक वेळा यांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र, त्याचा फारसा फायदा झाला नाही. 13 ऑगस्टला या दोघांच्यातील घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. न्यायालयानं मुलाची जबाबदारी दोघांवरही सोपवली आहे.

दरम्यान, कोंकणा आणि रणवीर या दोघांनी ट्रॅफिक सिग्नल, मिक्स्ड डबल्स, आजा नचले आणि गौर हरी दास्तान या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

आजोबा आणि नातवाच्या वादावर रोहित पवार म्हणाले…

धक्कादायक! माहेरी रहात असलेल्या विवाहित भाचीवर सख्ख्या मामानेच केला बलात्कार अन् मग…

ऐकावं ते नवलच! मौसम देवी या महिलेनं दिला चार बाळांना जन्म

अभिनेत्री श्रद्धा कपूरचं लवकरच शुभमंगल सावधान; ‘या’ व्यक्तिसोबत अडकणार विवाह बंधनात!

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कोरोनावर मात, ट्विट करत दिली माहिती