मुंबई | राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. तर कुठे गारपीट होत आहे. त्यातच आता आणखी तीन दिवस राज्यातील काही भागात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे तर काही भागांत गारा पडण्याचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आज पहाटे रत्नागिरीत अचानक जोरदार पाऊस पडला. अचानक हवामानात झालेल्या बदलामुळे आंबा आणि काजू बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली असून आंबा आणि काजूच्या बागांना मोहोर येत असताना झालेला हा बदल बागायतींसाठी अनुकूल नसल्याचंही म्हटलं जात आहे.
आज कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
IMD ने आज मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या मराठवाडा परिसरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
रविवारी मध्य प्रदेश तसेच सोमवार ते बुधवार संपूर्ण विदर्भ आणि छत्तीसगढसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने स्थानिक नागरिकांना हवामान बदलाच्या परिस्थितीबद्दल सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे.
हवामानातील या बदलाला अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातून वायव्य आणि लगतच्या मध्य भारतामध्ये येणाऱ्या उच्च पातळीची आर्द्रता कारणीभूत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
पुढील तीन ते चार दिवस मध्य भारतावर दोन्ही बाजूंनी वाऱ्यांचा संगम सुरू राहील. मध्य पाकिस्तानस्थित पश्चिम विक्षोभ तसेच नैऋत्य राजस्थानवर त्याच्या प्रेरित चक्रीवादळाचा प्रभाव असेल.
एकत्रितपणे या प्रणालींमुळे या आठवड्याच्या शेवटी उत्तर आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये दमट वातावरण निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
‘नो व्हॅक्सिन नो जॉब’; ‘या’ कंपनीने घेतला मोठा निर्णय
सावधान! Omicron ची लागण झालेल्या रूग्णांमध्ये दिसतायेत ‘ही’ गंभीर लक्षणं
…म्हणून गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण -एकनाथ खडसे
Corona | कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर ‘या’ गोष्टी सर्वात आधी करा