मोदींचा ताफा अडवला अन् ‘फुलराणी’ भडकली, म्हणाली…

मुंबई | देशाच्या पंतप्रधानांना सर्वांत मोठी सुरक्षा पुरवली जाते. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक राहिल्याने पंजाबमधील रॅली रद्द करण्यात आली आहे.

पंजाबच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधानांचा ताफा आंदोलकांनी अडवल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 20 मिनिटं उड्डाणपूलावरच अडकले होते. त्यामुळे आता देशात सध्या मोदींच्या सुरक्षेचीच चर्चा सुरू आहे.

पंजाबमधील झालेल्या घटनेमुळे आता भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

अशातच आता अनेक कलाकारांनी आणि खेळाडूंनी यावर भाष्य केलं आहे. भारताची स्टार बॅडमेंटनपटू सायना नेहवालने ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेशी तडजोड झाल्यास कोणतेही राष्ट्र स्वत:ला सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही, असं सायना नेहवालने सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अराजकवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करते, असंही सायना नेहवाल म्हणाली आहे.

या घटनेनंतर आता पंजाब सरकार विरूद्ध भाजप असा कलगीतुरा रंगला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी यावर उत्तर दिलं आहे. आमच्याकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली नाही, असं चन्नी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीमुळे आता गृहमंत्र्यालयाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

पंतप्रधानांच्या सुरक्षेत मोठी चूक, पंजाबमधील रॅली रद्द; भाजप नेत्यांची आक्रमक भूमिका

चारचौघांमध्ये राडा!, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भांडणाचा दुसरा व्हिडीओ व्हायरल

आत्ताची सर्वात मोठी बातमी! ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद

हात लावायचा नाय मला! महाविकास आघाडीतील आजी-माजी आमदार भिडले!

आरोग्यमंत्र्यानी बुस्टर डोसविषयी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती, म्हणाले…