ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानची सुटका मात्र समीर वानखेडेंच्या अडचणींत मोठी वाढ

मुंबई | कॉर्डिलिया क्रुझवर एनसीबीनं मोठा छापा टाकत अनेकांना ताब्यात घेतलं होतं. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी या कारवाईचं नेतृत्व केलं होतं.

कॉर्डिलिया क्रुझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणी आर्यन खान आणि समीर वानखेडे दोघेही चर्चेत आले होते. या प्रकरणानं संपूर्ण देशभर गदारोळ घातलेला पहायला मिळाला.

एनसीबीनं क्रुझवर छापा टाकत आर्यन खान आणि अनेकांनी अटक केली होती. मात्र आता आर्यन खानला हायप्रोफाईल कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने क्लीन चिट दिली आहे.

आर्यन खानला कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज नव्हते, असे एनसीबीने म्हटले आहे.

या प्रकरणामधील 14 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. आर्यन खानसह सहा जणांना या प्रकरणात क्लिनचीट मिळाली आहे.

एकीकडे आर्यनला दिलासा देण्यात आला असतानाच दुसरीकडे आर्यनला या प्रकरणामध्ये अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे अडचणीत सापडले आहेत.

या प्रकरणामध्ये निकृष्ट दर्जाचा तपास केल्याबद्दल आणि खोटं जातप्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गृहमंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी संभाजीराजेंची व्यवस्थितरित्या कोंडी केली”

  Monsoon Update| हवामान खात्यानं दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

  …म्हणून शरद पवारांनी बाहेरुनच घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन

  कोरोनाविषयी मुख्यमंत्र्यांचं सूचक आवाहन, म्हणाले…

  मोठी बातमी ! केंद्रीय मंत्री नारायण राणे रुग्णालयात दाखल