‘जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन’; एलोन मस्कचं वक्तव्य चर्चेत

नवी दिल्ली | टेस्ला कंपनीचे सीईओ एलोन मस्क हे सद्यस्थितीत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात एलोन मस्क यांनी युक्रेनच्या बाजूने भूमिका घेतली आहे. स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरू करत एलोन मस्क यांनी युक्रेनची मदत करण्याचा प्रयत्न केला होता.

एलोन मस्क यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याविषयी वक्तव्य केलं आहे. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आहेत, असं एलोन मस्क म्हणाले आहेत.

माझ्या मते पुतिन माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत व्यक्ती आहेत, असं एलोन मस्क यांनी म्हटलं आहे. एलोन मस्क यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

तसेच एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी पुतिन यांना चर्चेचं निमंत्रण देखील दिलं होतं. आमने सामने लढाईसाठी पुतिन तयार आहेत का?, या सिंगल सामन्यात युक्रेन पणाला असेल, असं एलोन मस्क  म्हणाले होते.

एलोन मस्क यांनी रशियन भाषेत ट्विट केलं होतं. तसेच व्लादिमीर पुतिन यांच्या अधिकृत ट्विट हँडेलला देखील टॅग केलं होतं.

अधिकृतपणे व्लादिमीर पुतिन यांच्याकडे राजवाडा, अपार्टमेंट आणि काही फ्लॅट्स आहेत. तसेच पुतीन यांना 1,40,000 डॉलर इतका पगार मिळतो.

दरम्यान, एलोन मस्क यांची संपत्ती 260 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक आहे. मात्र, रशियाचे राष्ट्राध्यक्ष  व्लादिमीर पुतिन यांच्या संपत्तीचे गुपित कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

  पुढील 3 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा 

 “संजय राऊतांनी केलेली माझी चेष्टा अंगावर येणार आहे, आता खूप काहीतरी…”

  “राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत” 

  “काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय” 

“तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेत, नाहीतर ते काय देणार घंटा”