कुत्र्याला लाथ मारायच्या नादात रिक्षाचालकाचा तोल सुटला अन्…, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आपण व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आपण सोशल मीडियावर अनेक विनोदी, तर कधी-कधी सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच क्यूटही असतात.

अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच आपल्या सर्वांना माहित आहे की, गाडी चालवताना खूप दक्षता घ्यावी लागते. तसेच चारही बाजूला लक्ष ठेवावे लागते. म्हणजे कोणत्या बाजूने कोणती गाडीतर येत नाहीयेना, हे पाहावं लागतं.

याच संदर्भात एक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. अत्यंत वेगात असलेल्या रिक्षा चालकासमोर अचानक एक कुत्रा समोर आला. समोर आलेल्या कुत्र्याला बाजूला करण्यासाठी चक्क रिक्षावाल्यानं रिक्षा चालवता-चालवता त्या कुत्र्याला पाय मारला.

रिक्षावाल्याला वाटलं की पाय मारल्यानंतर तो कुत्रा बाजूला जाईल. पंरतू असं काही न होता त्या रिक्षावाल्याचा तोल सुटला आणि ती रिक्षा रस्त्यावर गेली. त्या ठिकाणी असलेल्या लोकांनी रिक्षा सावरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या रिक्षाचालकाला कोणतीही जखम झाली नाही.

ही घटना पुणे जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहरातील शगुन चौकात घडली आहे. तसेच ही सगळी घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैदही झाली असून, तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलही होत आहे.

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ न्यूज 18 लोकमत या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक लोकांनी या व्हिडीओला मजेशीर कमेंट केल्या आहेत. तर काहींना त्या रिक्षाचालकावर संताप व्यक्त  केला आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत हा व्हिडीओ जवळजवळ एक हजार लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

तलावावर पाणी प्यायला आलेल्यावर मगरीने केला हल्ला अन्…,…

चार अंडी चोरणं पोलीस हवालदाराला पडलं महागात, पाहा व्हायरल…

मोबाईल पाहणं तरूणाच्या आलं अंगलट, पाहा व्हायरल व्हिडीओ

फ्रिज उघडताच चक्क मांजर शिरलं फ्रिजमध्ये अन्…, पाहा…

हवामानाची माहिती देताना अचानक महिला अँकरने असं काही केलं…