मुंबई | सध्या वाढत असलेल्या ओमिक्राॅनच्या (Omicron) धोक्यामुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार कठोर पावलं उचलत असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा दिला होता.
जानेवारी महिन्यात ओमिक्राॅनमुळे तिसरी लाट (Third Wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच आता महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू देखी लावण्यात आला आहे.
राज्यातील ओमिक्राॅन रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू नये यासाठी शासनाला तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अॅक्टिव झाल्याचं दिसतंय.
सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. त्याआधी मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत देखील बैठक घेतली होती. त्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता.
कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी लसीकरण मोहिम वाढवण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता अधिक काटेकोरपणे लक्ष देऊन कठोर पावलं उचलावीत, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
तसेच टास्क फोर्ससोबत बैठक आयोजित करण्यात याव्यात, असा आदेश देखील त्यांनी यावेळी दिला आहे. सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्याचा पाठपुरावा करून लसीकरण मोहिम वाढवावी, असे निर्देश देखील देण्यात आले आहेत.
दरम्यान, ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर आता राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लहान मुलांचंही लसीकरण होणार, अशी करा तुमच्या मुलांची नोंदणी
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?, शरद पवार म्हणाले…
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची चिन्हे; राज्यपालांची हरकत
‘नितेश राणेंनी चुकच केली’; देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा झापलं
‘तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’; विधानसभेत पुन्हा राडा