मुंबई | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपलं पुर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलं. पण त्यांना आपल्याच देशाच्या एका नागरिकांनं गोळ्या झाडून मारून टाकलं होतं.
महात्मा गांधीच्या हत्येनंतर देशासह जगाला हादरा बसला होता. पण देशातील एका व्यक्तीनं हत्या केल्यानं याचं कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. अशातच आता ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे.
राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनयाच्या क्षेत्रातील योगदानातून राजकारणात आलेले अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारल्यानं वाद वाढला आहे.
राष्ट्रवादीच्या खासदारनं नाही तर महाराष्ट्रातील कोणत्याही कलाकारानं त्या नथुरामची भूमिका साकारली असती तर मला वाईट वाटलंच असतं, असं राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
पक्षाचा आणि सर्वांचा काही संबंध असतो, असं मला वाटत नाही. राज्यातील कुठल्याही कलाकारानं नथुरामची भूमिका करावी हे मला पटलं नाही, असं स्पष्ट शब्दात आव्हाड म्हणाले आहेत.
अभिनय हा वारंवर करता येत नाही. एक कलाकार या नात्यानं कोल्हेंनी ही भूमिका नाकारायला हवी होती, असं आव्हाड यांनी म्हटल्यानं आता नथुरामचा वाद राजकारणात पेटणार असं चित्र निर्माण झालं आहे.
ज्या नथुरामनं महात्मा गांधींना गोळ्या घातल्या त्या माणसाचा अभिनय करणं मला मान्य नाही, या शब्दात आव्हाड यांनी कोल्हेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही. विनय आपटे, शरद पोंक्षे यांना जसा विरोध केला तसाच विरोध तुम्हाला देखील करणार, असं आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, गांधींच्या हत्येनंतर देशात नथुरामचं समर्थन करणाऱ्यांची कमी नव्हती पण आजपर्यंत एखाद्या खासदारानं अभिनयाच्या भूमिकेत नथुराम साकारण्याची गोष्ट पहिल्यांदा घडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आता इन्स्टाग्राम यूझर्संना देणार पैसे, जाणून घ्या कशी कराल चांगली कमाई
मद्यप्रेमींसाठी गुडन्यूज! दारु झाली स्वस्त, शिवाय ‘हा’ नावडता नियमही बदलला!
टाटा आणि मारुतीच्या CNG गाड्यांमध्ये काँटे की टक्कर, ‘ही’ देते जबरदस्त मायलेज
बापरे बाप ‘डोक्याला’ ताप! Omicronची ‘ही’ लक्षणे महिनाभर दिसतात; वेळीच घ्या काळजी
उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का, आता…