मुंबई| सोशल मीडियावर आपल्याला रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात. अशा व्हिडीओला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत असते.
काही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार असतात. तर काही व्हिडीओंना पाहून आपण अवाक् होऊन जातो. सध्या असाच एक चमत्कारीक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक कोंबडा चक्क ‘अल्लाह अल्लाह’ म्हणत जप करताना दिसतोय.
आज रमजान ईदमुळे या व्हायरल झालेल्या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये एक कोंबडा दाखवण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये मागे कोणीतरी अल्लाह-अल्लाह म्हणत आहे. त्याच वेळी माणसाची नक्कल करत व्हिडीओतील कोंबडासुद्धा स्पष्टपणे अल्लाल-अल्लाह असे म्हणतोय.
कोंबडा असं काही म्हणेल यावर लगेच कोणालाच विश्वास बसणार नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकतो कोंबडा अल्लाह अल्लाह बोलत आहे.
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी कोंबड्याचे बोलणे पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. reelkarofeelkaro, या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या –
कोरोना झालेल्या आईला कोणीही खांदा द्यायला तयार नाही म्हणून…
कौतुकास्पद! पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीने केली…
चक्रिवादळाचा इशारा; महाराष्ट्रातील ‘या’ भागात…
‘कोरोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा…
वजन कमी करण्यासाठी चक्क मांजर करतीय एक्सरसाईज, पाहा व्हायरल…