Top news कोरोना

महिलांसाठी जास्त धोकादायक ठरतेय कोरोनाची दुसरी लाट, ‘हे’ कारण आलं समोर

Photo Credit - Pixabay

हैद्राबाद| कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेक लोक पुढे येत सढळ हातानं मदत करत आहेत.

कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक धोकादायक ठरत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये महिलांना अधिक संसर्ग होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हैदराबादमधील आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या महिलांचे प्रमाण 38.5 टक्क्यांवर पोहोचले आहे. हे प्रमाण गतवर्षी जुलै महिन्यात 34 टक्के होते.

महाराष्ट्रात हे प्रमाण तब्बल 38 टक्के एवढे आहे. तर बिहारमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. बिहारमध्ये ४२ टक्के महिला बाधित झाल्या आहेत. संपूर्ण देशाचा विचार केल्यास कोरोनाच्या एकूण रुग्णांमध्ये महिलांचे प्रमाण 35.4 टक्के आहे. तर पुरुषांचे प्रमाण 64.6 टक्के आहे.

सर्वसामान्यपणे महिला कोरोनाबाबतच्या नियमावलीचे पालन करतात. तर काम किंवा अन्य कारणांमुळे पुरुष हे महिलांच्या तुलनेत अधिक घराबाहेर पडत असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका अधिक असतो. मात्र आता महिला आणि कमी वयाच्या लोकांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

अजबच! कोरोना काळात व्हिडीओ काॅलवर खोकण्या-शिंकण्यासाठी…

पुरुषांनीही अनुभवल्या मासिक पाळीत स्त्रियांना होणाऱ्या…

लाॅकडाऊनमध्ये मोकाट फिरणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी घडवली…

दबा धरून बसलेल्या बिबट्याने रस्ता पार करत असलेल्या हरणावर…

पोटासाठी वणवण! भूक भागवण्यासाठी तरुण रस्त्यावर सांडलेलं दूध…

IMPIMP