मुंबई | अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिकांनी अनेक खळबळजनक खुलासे करण्यास सुरूवात केली होती. नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.
अशातच आता मलिकांनी आरोपाची मालिका सुरूच ठेवल्याचं दिसून येतंय. नवाब मलिकांनी काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या गंभीर आरोप केले आहेत.
नवाब मलिकांनी एक ट्विट करत अमृता फडणवीस आणि एका ड्रग्ज पेडलरचा फोटो शेअर केला आणि फडणवीस यांचा ड्रग्ज पेडलरसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप मलिकांनी केला होता.
त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. अशातच आता नवाब मलिकांनी ट्विट करत भाजपचं टेन्शन वाढवलं आहे.
अमृता फडणवीस यांच्या आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी रविवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं देखील मलिकांनी सांगितलं. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा ट्विट करत भाजपला चिमटे काढले आहेत.
शुभ दीपावली आप सभी की दिवाली मंगलमय हो, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. हाॅटेल ‘The Lalit’ मे छुपे है कई राज़, असं ट्विट करत मलिकांनी भाजपला सुचक इशारा दिला आहे.
मिलते है रविवार को, असं म्हणत मलिकांनी भाजप नेत्यांचं टेन्शन वाढवल्याचं दिसून येतंय. त्यानंतर आता रविवारी मलिक कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे आता सर्वांचच लक्ष लागलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक व्यक्ती नीरज गुंडे हा मुंबई शहरात राहातो. ज्याला माजी सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवास, कार्यालयात आणि सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची परवानगी होती, असं मलिकांनी सांगितलं होतं.
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होत असताना गुंडे हा भाजप आणि शिवसेना यांची युती टिकवण्याचा प्रयत्न करत होता, असा आरोप देखील मलिकांनी केला आहे.
दरम्यान, मलिकांनी गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता रविवारी मलिक कोणता नवा गौप्यस्फोट करतील याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“चला आव्हान स्वीकारलं, आता होऊन जाऊ दे दूध का दूध और पानी का पानी”
“अजित पवार फसवाफसवी आणि बनवाबनवी करणं थांबवा”
सोनं खदेरी करणाऱ्यांसाठी सुर्वणसंधी, सोन्याच्या दरात झाली ‘इतक्या’ रूपयांची घट
“…पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर एक शब्द देखील काढला नाही”
पराभवानंतर सुभाष साबने यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…