‘कर्ज हवं असेल तर आधी शरिरसुख दे’ सोसायटीच्या सचिवाने महिलेकडे केली मागणी अन्…

यवतमाळ | सगळीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. दररोज हाणामारी, हत्या केल्याच्या घटना घडल्याचं कानावर येतं असतं. यामुळे समाजात हिंसक वातावरण निर्माण होत चालल आहे.

महिलांवर बलात्कार केल्याच्या, त्यांचा छळ केल्याच्या अशा अनेक प्रकारच्या घटना राज्यात वारंवार घडत आहेत. अशातच यवतमाळमध्ये एक धक्कादायक घटना घडली असल्याची माहीती समोर आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यामधील नायगाव तालुका दारव्हा या ठिकाणी एका सोसायटी सचिवाने महिलेकडे थेट शरिरसुखाची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शेतीसाठी कर्ज पाहिजे असेल, तर मला आधी शरिरसुख दे अशा शब्दात सचिवाने शेतीसाठी कर्ज मागायला आलेल्या महिलेकडे केली. शेतकी महिलेने या प्रकरणाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये त्या सचिवाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

तसेच तक्रार दाखल करताना शेतकरी महिलेने तिच्यात आणि सचिवात काय बोलणे झालं. याचं कॉल रेकॉर्डिंगही तक्रार दाखल करताना पोलीस स्टेशनमध्ये दिलं आहे. यावरून आरोपी दादाराव इंगोले यांच्या विरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकरी महिलेच्या पतीकडे चार एकर बागायती शेती आहे. दुधाच्या व्यवसायाकरिता तिने नायगाव ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सचिव इंगोले याच्याकडे 5 लाखांचे कर्ज पाहिजे असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी दादासाहेब इंगोले यांनी 10 लाखांचे कर्ज मिळवून देतो असं सांगितलं होते.

परंतू महिलेने कागपत्र देऊन सहा महिने झाले, तरीही तिला कर्ज मिळालं नसल्याचं शेतकरी महिलेनं तक्रार दाखल करताना नमूद असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडली होती. त्यावेळी बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखाधिकाऱ्याने शेती कर्ज मंजूर करण्यास शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. या प्रकरणाचा आरोपी सध्या तुरूंगात आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘हा’ व्हिडीओ हलक्या काळजाच्या लोकांनी पाहू नका,…

आपल्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी चिमणीने लढवली…

चक्क घरात शिरून तरूणाने केली विधवा महिलेकडे शरिरसुखाची मागणी…

यवतमाळमध्ये एकच खळबळ! तरूणीने रचला प्रियकाराच्या मदतीने…

ह्रदयद्रावक! कोरोना झालेल्या वडिलांना पाणी पाजण्यासाठी…