मुंबईतल्या फाईव्ह स्टार हाॅटेलच्या वॉशरूममध्ये अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

दक्षिण मुंबईतील एका फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये एका अभिनेत्रीसोबत गैरवर्तन झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहेे. हाॅटेलच्या  वॉशरूममध्ये ही घटना घडल्याचं समजतंय.

पीडित अभिनेत्री वेब सीरिजच्या शूटिंगच्या निमित्तानं हाॅटेलमध्ये राहत होती. शूटिंग झाल्यावर ती हाॅटेलच्या  वॉशरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली असताना ही घटना घडल्याचं समोर येतयं. रविवारी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याविरोधात मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती अभिनेत्री हॉटेलच्या 37 व्या मजल्यावरील एका वॉशरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली होती. त्यावेळी अचानक दिलेश्वर महंत या 22 वर्षाच्या आरोपीनं तिला पकडून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने तिला घट्ट पकडून ठेवलं. आरोपीच्या तावडीतून पीडितेनं कशीबशी स्वतःची सुटका केली. त्यानंतर आरोपीला हॉटेलमधील बाकी कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतलं.

पीडित अभिनेत्रीनं आरोपीविरोधात एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. यावर अजून चौकशी सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या –

          ‘KGF’ हा आमच्यासाठी फक्त चित्रपट नाही तर सर्वकाही, त्यामुळे…’; चाहत्याचं मोदींना पत्र

….म्हणून आमिर खान ठेवणार मोबाईल फोन बंद, जाणून घ्या!

आता गॅ.स सि.लेंडर बुक करणं झालं अगदी सोप्प, बुकिंगसाठी द्या फक्त एक मिस्ड कॉल

शेतकरी आं.दोलन आणखी भ.डकण्याची शक्यता! संजय राऊतांचं मोठं पाऊल

बजेटचा सोन्यावर परिणाम; सोनं इतक्या रुपयांनी घसरलं!