नवी दिल्ली | चित्रपट जगतामध्ये काम करत असताना एका बाजूनं छान प्रतिमा दाखवण्यात येतात. पण कधीकधी अनेक खळबळ माजवणाऱ्या घटना समोर यायला लागतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे.
प्रसिद्ध गाजलेली सिरीज म्हणून ‘सेक्स अॅंड द सिटी’ या शो ला ओळखण्यात येतं. या सिरीजमधील अभिनेता क्रिस नाॅथ हा आता वादात सापडला आहे. आपल्या अभिनयासोबत क्रिसनं अनेक कारनामे केल्याचा आरोप त्याच्यावर झाला आहे.
क्रिसवर आतापर्यंत 5 महिलांनी यौन उत्पीडनाचा आरोप केला आहे. या आरोपांनी सर्वत्र खळबळ माजली आहे. सध्या क्रिसवर झालेल्या या आरोपांची चौकशी चालू आहे.
प्रसिद्ध गायीका लिसा जेन्टाईल हिने क्रिसवर अत्याचाराचा आरोप केला आहे. आपल्या वकीलासोबत लिसाने पत्रकार परिषद घेत क्रिसवर हे आरोप केले आहेत. परिणामी सर्वत्र खळबळ माजली आहे.
क्रिस नाॅथ याने माझं बळजबरीनं चुंबन घेतलं. तसंच माझे स्तन दाबण्याचा प्रयत्न केला, असे आरोप क्रिसवर करण्यात आले आहेत. क्रिसवर आरोप करताना लिसानं घडलेला घटनाक्रम सांगितला आहे.
क्रिस जेव्हा हे सगळं माझ्यासोबत करत होता तेव्हा त्याला मी थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. असंही लिसा म्हणाली आहे. परिणामी क्रिसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मी क्रिसला विरोध केला तेव्हा त्यानं मला माझं करिअर बरबाद करण्याची धमकी दिली होती. परिणामी मला गप्प बसावं लागलं आहे. त्यानं केलेला अत्याचार मी कधीही विसरू शकत नाही, असं लिसा म्हणाली आहे.
न्युयाॅर्कमध्ये एका रेस्टाॅरंटमध्ये दोघांची मैत्री झाली. आम्ही दररोज म्युझीकबद्दल बोलत असायचो. त्या रेस्टाॅरंटा मालक हा लिसाचा मित्र होता, असं लिसानं म्हटलं आहे.
एका रात्री क्रिस म्हणला की तुला घरी सोडतो मी नकार देऊ शकले नाही. जेव्हा त्यानं मला माझ्या घरी सोडलं तेव्हा तो अचानक माझ्या घरात घुसला आणि माझ्यासोबत बळजबरी करू लागला, असं लिसा म्हणाली आहे.
दरम्यान, लिसाच्या या आरोपांमुळं परत एकदा सिनेमाजगताला हादरवून टाकलं आहे. लिसा आणि क्रिसच्या प्रकरणात सध्या कायदेशीर बाबींची तपासणी चालू आहे.
महत्वाच्या बातम्या –
दोन जीव एक शरीर! आई बापानं वाऱ्यावर सोडलं, पण…
‘…म्हणून धोनीला मेन्टाॅर केलं’; कोहली-बीसीसीआय वादानंतर नवा खुलासा
रामदास कदमांचं पुन्हा बंड! अधिवेशनात ठाकरे सरकारला दिला थेट इशारा
“लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील आणि भक्षक असतील तर…”