महाराष्ट्राला हादरवलेल्या चंद्रपूरमधील ‘त्या’ मुलीच्या हत्येमागचं धक्कादायक सत्य समोर!

चंद्रपूर | धडावर मुंडकं नसलेला एक मृतदेह पोलिसांना सापडल्यानं खळबळ उडाली होती. अखेर या घटनेचं गुढ उलगडवण्यात पोलिसांना यश आलं आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीनेच हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, तिच्यासोबतचा साथीदार युवक फरार आहे. मयत मुलीचं शीर अजूनही पोलिसांना सापडलेलं नाही.

भद्रावती शहरातील सुमठाना परिसरात शासकीय ITI कॉलेजच्या समोर असणाऱ्या शेतात एका तरुणीचा मुंडकं गायब असलेला मृतदेह 4 एप्रिल रोजी दुपारी आढळून आला होता.

शासकीय ITI कॉलेजच्या समोर अमोल झाडे यांचं शेत आहे. दुपारी ते आपल्या शेतात जात असताना बाजूच्या शेतात एका तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह त्यांना दिसला.

जेव्हा ते मृतदेहाच्या जवळ गेले तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला. कारण तरुणीचं मुंडकं नसलेला मृतदेह तिथे पडला होता. त्यामुळे अमोल यांनी याप्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना दिली होती.

या प्रकरणात तब्बल 6 दिवसांनी पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपमानाचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीनेच मैत्रिणीची एका साथीदाराच्या मदतीने हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“भाजपचे नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागतायेत” 

सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का; महत्त्वाची माहिती समोर 

“हलकट राजकारण कधी अनुभवलं नाही, पवार साहेबांच्या घरावरील हल्ल्यानंतर…” 

बॅटिंग करता करता आश्विनने सोडलं मैदान; IPL इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं…

Sharad Pawar : “शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज…”