नाना पटोलेंचा हॉटेलमधील ‘तो’ व्हिडीओ चित्रा वाघ यांनी केला शेअर!

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील नाना पटोलेंचा हा व्हिडीओ ट्विट केलं आहे. यावरून चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नाना पटोले चेरापुंजी, मेघालय येथे हॉटेलमध्ये एका महिलेसोबत खुर्चीवर बसल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये नाना पटोले यांचे फोटोही जोडण्यात आलेत.

सोबत काय झाडी काय डोंगर हे गाणेही जोडण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये नाना पटोले असल्याचं म्हणत तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नाना पटोलेंचा व्हिडिओ माझ्याकडे आल्यानंतर मला धक्का बसला, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.

दरम्यान, या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. नाना पटोले यांनीही याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात कायदेशीर सेलद्वारे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे.

बदनाम करण्याचं हे कटकारस्थान आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची आमची भूमिका असणार आहे, असं नाना पटोले यांनी म्हटले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

खासदार नवनीत राणा यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

सर्वात मोठी बातमी! ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय 

करिना कपूर खान तिसऱ्यांदा आई होणार?, स्वत:च केला खुलासा 

‘घोटाळे तुम्ही करायचे, लफडी तुम्ही करायची पण जेव्हा…’, खासदारांच्या बंडानंतर आदित्य ठाकरे संतापले