‘तुझं गाणं कोण ऐकत, तू नाकातून गातो’, असं म्हणणाऱ्याला गायकानं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाला…

मुंबई| अद्वितीय सुरांच्या सादरीकरणातून असंख्य रसिकांच्या पसंतीस उतरलेले एक नाव म्हणजे महेश काळे. त्यांना सर्वाधिक लोकप्रिय शास्त्रीय गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. अशातच ते सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या गोष्टीवर चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया त्यांना कळवायच्या असतात. परंतु, सध्या कलाकारांना प्रत्येक छोट्या गोष्टीवरून ट्रोल करायचा प्रयत्न चाहत्यांकडून होताना दिसतो. केवळ अभिनेते नव्हे तर गायक, संगीतकार देखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात.

महेश काळे यांचा कार्यक्रम म्हटला की लोक अफाट गर्दी करतात. अनेक दर्दी तर महेशची तुलना प्रख्यात गायक भीमसेन जोशी यांच्याशी करतात. मात्र ही तुलना काही रसिकांना आवडलेली नाही. त्यामुळे त्यांनी महेश यांना ट्रोलही केलेलं आहे.

महेशने या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले. महेशने आपला एक फोटो फेसबुकवर शेअर केला. त्याच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. मात्र काहींनी हा फोटो सोडून महेशच्या गायन शैलीवरून त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

एका युजरनं तर “भिमसेन एकच होऊ शकतात… तू तर नाकात गातो एवढं कर्कश कोण ऐकतं कोण तूला…” अशा शब्दात त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

यावर महेशनं देखील फार संयमान प्रत्युत्तर दिलं. “खरं आहे, एकच होऊ शकतात ते. असाच आवाज देवाने दिला आहे तर काय करु आता. मला पण कळत नाही का आवडतो लोकांना ते. तुम्ही सुखरुप रहा.” असं ते म्हणाले. त्यांच्या या उत्तरावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

महेशने ‘नकुशी’ या मालिकेसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेचे टायटल साँग महेशने संगीतबद्ध केले आहे. ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळे महेश काळे हे नाव सर्वदूर पोहोचले. या सिनेमासाठी महेशला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

सध्याच्या काळात धांडगधिंगाणा असलेली गाणी जास्त लोकप्रिय झालेली दिसतात. मात्र त्याही परिस्थितीत महेश काळे आपल्या जबरदस्त गायन शैलीच्या जोरावर रसिकांना भूरळ पाडताना दिसतो. त्याच्या लाईव्ह कार्यक्रमांना देखील प्रेक्षकांची अफाट गर्दी होते.

mahesh kale

महत्वाच्या बातम्या – 

ख्रिस गेलचं ‘हे’ गाणं सोशल मिडीयावर तूफान…

कोरोनामुळे अशी झाली कतरिना कैफची अवस्था, फोटो शेअर करत…

जाणून घ्या ! कोरोना लस घेण्याआधी आणि घेतल्यानंतर काय खावे,…

मेडीकल कॉलेजमधील प्रचंड गाजलेला ‘तो’ व्हिडीओ…

‘बिग बॉस’च्या ‘या’ अभिनेत्रीवर…