क्रिकेट इतिहासातील सर्वात छोटा सामना, त्यादिवशी झालं असं की…

मुंबई | कसोटी क्रिकेटचा फाॅर्मट म्हणजे क्रिकेटचा आत्मा समजला जातो. अनेक खेळाडूंची कसोटी या सामन्यात होत असते.

एखादा फलंदाज किती कच्चा किंवा पक्का याचं एकक मोजण्याचं माप म्हणजे कसोटी क्रिकेट मानलं जातं. अशातच क्रिकेट इतिहासातील सर्वात छोटा सामना म्हणून एका सामन्याची नोंद झाली होती.

34 वर्षांपूर्वी जमायकामध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात इंग्लड आणि यजमान वेस्ट इंडिजचे संघ आमने-सामने आले होते.

या सामन्यात काही असं घडलं की, या सामन्याचा सर्वात लहान सामन्यात त्याचा समावेश झाला होता. त्यानंतर तो रेकाॅर्ड आतापर्यत कोणाला मोडता आला नाही.

सामन्यातील खेळपट्टी इतकी धोकादायक होती की, कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर उभा राहण्याची भीती वाटत होती.

इंग्लड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब खेळपट्टीमुळे पंच स्टिव्ह बकनर आणि एस व्यंकटराघवन यांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला.

धोकादायक खेळपट्टीवरील भेगांमुळे चेंडू खूप उसळी घेत होता, अशातच वेस्ट इंडिजचे दोन बलाढ्य वेगवान गोलंदाज त्यांच्या उंचीचा फायदा घेत हाडे मोडणारे बांउसर्स फेकत होते.

त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांच्या मनात धडकी भरली. या सामन्यात 3 बाद 17 अशी इंग्लंडची परिस्थिती झाली होती.

क्रिकेटच्या सर्वात मोठ्या म्हणजेच कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वात लहान 61 चेंडूंचा सर्वात छोटा सामना म्हणून या सामन्याची इतिहासात नोंद आहे.

दरम्यान, 29 जानेवारी 1988 ला कमी चेंडूचा सामना म्हणून इतिहासात नोंद झाली.

महत्त्वाच्या बातम्या – 

ना रश्मिका ना प्रिया! नव्या ‘नॅशनल क्रश’ची सोशल मीडियावर एकच चर्चा

 “त्यांनी 7 कोटींचा ट्रस्ट ताब्यात घेतला”, अंनिस वादाच्या भोवऱ्यात; अविनाश पाटील यांचे गंभीर आरोप

SBI च्या ग्राहकांसाठी महत्वाची माहिती; ‘हा’ नियम बदलणार

पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून सुरू होणार, अजित पवारांची मोठी घोषणा

लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणणाऱ्या न्यायाधीशांना…- संभाजी भिडे