सांगली | मागील काही दिवसांपासून बुलडोझर राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी बुलडोझरने कारवाई करण्यात आली होती. भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी जेसीबीवर उभं राहून फोटो काढला होता. तो फोटो तुफान व्हायरल झाला होता.
त्यानंतर आता सांगलीत बुलडोझरचा वापर करुन काही चोरट्यांनी संपूर्ण एटीएम मशीन चारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात ही घटना घडली आहे.
चोरट्यांनी आधी पेट्रोल पंपावरून जेसीबी चोरला. त्यानंतर त्यांनी थेट एटीएम गाठत लूट केली. शनिवारी रात्री साडेबारा वाजता आग्रा चौकातील ही घटना असल्याची माहिती मिळाली आहे.
ज्या वेळी एटीएम मशीन चोरण्यात आलं त्यावेळी त्यात 27 लाख होते, अशी माहिती मिळाली आहे. चोरट्यांचं हे कृत्य पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एक व्यक्ती प्रथम एटीएम मशिनमध्ये जातो. त्यानंतर काही वेळात तो पुन्हा बाहेर जातो. त्यानंतर अचानक जेसीबी घात जाते आणि चोरटे चोरी करून निघून जातात.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज हाती घेतले असून चौकशी करत आहेत.
पाहा व्हिडीओ-
#कानून का कोई भय ही नहीं रह गया ऐसे धोखेबाज मक्कार लोगों को , देखें महाराष्ट्र में ATM को जेसीबी मशीन से उखाड़ दिया । ये संगीन अपराध है इसकी सजा कड़ी होनी चाहिए #Crime #JCB #sangli #Maharashtra #theft 💔💔 pic.twitter.com/uEpMt4Tv51
— ℝ𝕠𝕙𝕥𝕒𝕤𝕙 रोहताश (@RohtashMandan25) April 25, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
भर मांडवात नवरा बायकोची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
‘….हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही’; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
मोठी बातमी! राज ठाकरेंना झटका, सभेपूर्वी पोलिसांनी उचललं मोठं पाऊल