मुंबई | सध्या एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन चिघळत चालल्याचं दिसत आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. यावर नुकतच राज्य सरकारनं तोडगा काढला आहे. यामध्ये त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. यात विलगीकरणाची मागणी सोडून बाकी सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत.
राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यास सांगितलं जात आहे. त्यामुळे एसटी कर्मचारी आता संप मागे घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असतानाच आता हे आंदोलन आणखी चिघळल्याचं दिसत आहे.
राज्यभरात सुरु असलेलं हे एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन आणखी गरम झालं असून कर्मचाऱ्यांनी अनेक ठिकाणी अर्धनग्न आंदोलन करण्यास सुरु केलं आहे. त्यामुळे आता हे आंदोलन जास्तच तीव्र होताना दिसत आहे.
राज्यभरात पुकारलेल्या या संपात सहभागी झालेल्या औरंगाबाद आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन सुरु केलं आहे. मंगळवारी सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी तीव्र निदर्शनं सुरु केली आहेत.
याशिवाय पुण्यातील शिवाजीनगर भागातील वाकडेवाडी येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर कामगार अर्धनग्न आंदोलनास बसले आहेत. दिवाळीच्या तोंडावर सुरू असलेल्या या संपाचा फटका मात्र सामान्य प्रवाशांना बसत असून संपामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वादात प्रवाशांचे कोंडी होत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारनं आत खासगी बसेस, स्कूल बसेस, कंपनीच्या बसेस आणि मालवाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांना प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी दिली आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन अखेर हायकोर्टात पोहोचलं आहे. उच्च न्यायालयानं महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी समजण्यात यावं म्हणून समिती स्थापन केली आहे. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांची महत्त्वाची बैठक पार पडली.
महत्त्वाच्या बातम्या –
सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा आजचे ताजे दर
कर्णधारपद सोडल्यावर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला…
अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला पुन्हा मुंबई पोलिसांकडून अटक