राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई | राज्यात सध्या थंडीची लाट उसळली आहे. पण ऐन थंडीच्या दिवसात हवामान खात्याकडून राज्याला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात आज (28 डिसेंबर) आणि उद्या (29 डिसेंबर) असे दोन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात पुढचे दोन दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर काही भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

आयएमडीकडून विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आयएमडीने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यात 28 डिसेंबर रोजी अमरावती, नागपूर, वर्धा आणि भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर औरंगाबाद, जालना आणि गोंदीया जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, धुळे, नाशिक या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे.

29 डिसेंबरला राज्यातील भंडारा, गोंदीया, नागपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वातावरणात बदल पाहायला मिळत आहेत. या बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी ऐन थंडीत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. धुक्याचा परिणाम थेट विमान वाहतूकीवर झाला आहे.नागपूर विमानतळावरून उडणारी विमानं धुक्यामुळं स्थगित करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

…तर राज्य सरकारलाही राजकीय पावलं टाकावी लागतील- संजय राऊत

मधुमेह असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर

रोहिणी खडसेंच्या कारवरील हल्ल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण!

कामावर रूजू न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांविरोधात सरकार आक्रमक; केली ‘ही’ मोठी कारवाई