पुणेकरांनो काळजी घ्या; गेल्या 24 तासातील रूग्णांच्या आकडेवारीने टेंशन वाढवलं

पुणे | पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासात 206 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 146 रुग्णांची नोंद बी.जे वैद्यकीय महाविद्यालय आणि 60 रुग्णांची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत नोंद करण्यात आली होती. हे सर्व 206 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातील आहे.

आज राज्यात 525 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद केली आहे. तर ओमिक्रॉनचे (Omicron in pune) 200 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. ही रुग्णांची नोंद पुणे महापालिकेत झाल्याचं सांगितलं जात आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन अहवालानुसार, गेल्या 24 तासांत राज्यात 992 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 77,15,711 करोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 98.07टक्के इतकं आहे. आज राज्यात 525 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 9 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,81,38,182 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,67,916 (10.97 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 28.878 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर 595 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरस सतत स्वतःला बदलत राहतो. उत्परिवर्तनामुळे, हा व्हायरस नवीन व्हेरिएंटमध्ये बदलू शकतो. जर हा व्हेरिएंट वेगानं पसरला आणि लस किंवा नैसर्गिक प्रतिकारशक्तीला मागे टाकलं तर कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात, असंही त्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

मेडिकल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंद महिंद्रांनी घेतला मोठा निर्णय! 

“उद्या ओबीसींचं आरक्षण गेलं तर ठाकरे सरकारला जबाबदार धरू नका” 

तब्बल 9 वर्षांनंतर श्रीसंतला विकेट मिळाली, मैदानावर केलं असं काही की…; पाहा व्हिडीओ 

रशियामुळे भारत-अमेरिकेचं बिनसलं?; बायडन यांची नाव न घेता भारतावर टीका

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! राज्याच्या ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता