शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्समध्ये तब्बल ‘इतक्या’ अंकांची घसरण, गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका

मुंबई | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारातील उतरता क्रम कायम असल्याचं दिसून येत होतं. त्यानंतर बाजारात मोठी किंचित वाढ देखील झाली होती. अशातच आज बाजारात मोठी घट झाल्याचं पहायला मिळतंय.

गुजरातमध्ये बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल 28 बँकांना शिपयार्ड कंपनीनं 22 हजार 842 कोटींचा चुना लावल्याचं समोर आलं होतं.

हा घोटाळा एप्रिल 2012 ते जुलै 2017 यादरम्यान झाला आहे. सीबीआयद्वारे दाखल करण्यात आलेला हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं बोललं जात आहे. याचा थेट परिणाम शेअर बाजारवर झाला आहे.

युक्रीन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे भारतीय शेअर बाजारात थेट परिणाम होत आहे. भारतीय बाजारातील अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे.

ऑटो, बँक, तेल आणि वायू, पीएसयू बँक, फार्मा, एफएमसीजी, मेटल, रिअॅल्टी आणि भांडवली वस्तू निर्देशांक 2-6 टक्क्यांनी घसरले आहेत.

सेन्सेक्समध्ये 1,747.08 अंकांची घसरण झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे सेनसेक्स 56,405.84 वर पोहचला आहे. त्याचबरोबर निफ्टीमध्ये देखील घट झालीये.

निफ्टीमध्ये 531.95 अंकाची घट होवून 16,842.80 वर पोहचला.  तर बँक निफ्टीमध्ये देखील मोठी घट झाली. बॅक निफ्टीमध्ये 1,608.70 अंकाची घट झालीये.

दरम्यान, आज मार्केटमध्ये झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा फटका बसल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता उद्या मार्केटमध्ये काय घडामोडी घडतात यावर सर्वांचं लक्ष लागलंय.

महत्त्वाच्या बातम्या – 

“राऊतसाहेब अनिल देशमुखांच्या शेजारची खोली रिकामी आहे, हिंमत असेल तर…”

शिवजयंती उत्सवाबाबत नियमावली जारी, वाचा काय आहेत निर्बंध

कुडाळमध्ये शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा, पोलीस घटनास्थळी दाखल

Valentine’s Day | ‘तु माझा आहेस’; मलायकाने शेअर केला अर्जुनसोबतचा रोमॅन्टिक फोटो

 “काँग्रेस बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, राहुल-प्रियांकाच पुरेसे आहेत”