तालिबान्यांचा यु-टर्न! लवकरच ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

काबूल | जगाच्या भुगोलात आणि इतिहासात अनेक बदल झाले आहेत. गतवर्षी झालेल्या एका बदलानं मात्र जगाचा भुगोल आणि इतिहास दोन्ही बदलताना दिसत आहे. एका दहशतवादी संघटनेनं देशावर कब्जा करण्याची घटना ही ऐतिहासिक आहे.

अफगाणिस्तान सरकारच्या राजवटीला हादरे देत कुख्यात दहशतवादी संघटना तालिबाननं अफगाणिस्तानात आपली राजवट प्रस्थापित केली आहे. त्यानंतर मानवतेचा अन्याविरोधातील लढा अधिक तीव्र झाला आहे.

अफगाणिस्तानच्या सरकारला तब्बल 20 वर्ष झुंज देऊन तालिबाननं आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आफगाणिस्तानच्या नागरिकांवर अनेक बंधणं लादण्यात आली आहेत.

तालिबान ही दहशतवादी संघटना मुळातच महिलाविरोधी मानसिकतेची प्रतिक मानली जाते. परिणामी सत्तेत येताच अफगाणिस्तानच्या महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे.

प्रवास, खाणपाण, शिक्षण, फिरणे, सार्वजनिकरित्या वावरणे यावर बंधनं आणली गेली होती. त्यानंतर जगातील अनेक देशांनी देखील तालिबानच्या अडचणी वाढवायला सुरूवात केली होती.

आता तालिबान जगाच्या वाढत्या दबावाच्या कारणानं महिलांना काही क्षेत्रांमध्ये सुट देण्याबाबत विचार करत असल्याची माहिती तालिबानकडून देण्यात आली आहे.

तालिबान सरकारचे माहिती आणि सांस्कृतिक कार्यउपमंत्री जबिहुल्ला मुजाहिद यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. अफगाण नवीन वर्षानंतर 21 मार्चपासून सर्व विभागात महिला आणि मुलींसाठी शिक्षणाचे वर्ग भरवण्यात येणार असल्याचं मुजाहिद म्हणाले आहेत.

शिक्षण हा मुली आणि महिलांसाठी सक्षमतेचा प्रश्न आहे. मुली आणि मुलांसाठी शाळांमध्ये पुर्णपणे स्वतंत्र व्यवस्था असावी याचा विचार तालिबान करत असल्याचं मुजाहिद म्हणाले आहेत.

तालिबान सरकार सध्या मुलींच्या शिक्षणावर गांभिर्यानं विचार करत आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था स्थापन करण्याचा आमचा विचार आहे. तालिबान मुलींच्या शिक्षणाच्या विरोधात नाही, असं मुजाहिद म्हणाले आहेत.

दरम्यान, तालिबाननं अचानकपणे महिलांच्या शिक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण मुली शाळेत जाईपर्यंत जगातील कोणालाच विश्वास बसणार नाही हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या – 

 किरण माने प्रकरणाला वेगळं वळण! सहकलाकारांनी केलेल्या आरोपामुळं खळबळ

 विराटनंतर कॅप्टन कोण???, लिटल मास्टरने घेतलं ‘या’ खेळाडूचं नाव

अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद

शाळा सुरू करण्यासंदर्भात राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“दुधातील माशी प्रमाणे मित्रपक्षांनी बाजूला फेकलं”