काबूल| अफगाणिस्तानवर तालीबाननं पूर्णपणे कब्जा केला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानमधील महिला-पुरूषाच, त्याचबरोबर त्या ठिकाणच्या लहान मुलांचं देखील जगणं मुश्किल झालं आहे.
अशातच याच संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला रिपोर्टर तालिबानीला एक सवाल विचारते, तर त्यावर तालीबानी जोर-जोरात हसू लागतात. व्हारल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये महिला रिपोर्टरने महिलांच्या राजकारणातील प्रवेशांबद्दल प्रश्न विचारला असल्याचं पहायला मिळतं आहे.
तसेच महिला नेत्यांना अफगाणिस्तानमधील नागरिक मत देतील का?. हे सगळे प्रश्न ऐकून झाल्यानंतर तालीबानी मोठं-मोठ्याने हसू लागले आणि त्यांनी त्यांच्यासमोर सुरू असलेला कॅमेरा बंद करण्यास सांगितला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला रिपोर्टर आणि तालीबानचा हा व्हिडीओ खूप जुना असल्याचं समजतं आहे. 1996 ते 2001 च्या दरम्यान तालीबानीनं अफगाणिस्तानवर कब्जा केला होता. आणि आजही त्याचप्रमाणे तालीबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
परंतू तेव्हा आणि आतामध्ये कालीबानमधील वागण्यात खूप मोठा बदल झाला असल्याचं दिसून येतं आहे. हा व्हिडीओ एका डोक्यूमेंट्रीमधील एक छोटीशी क्लिप असल्याचं समजतं आहे. सध्या कालीबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा एकदा कब्जा केला असल्यानं ही क्लिप खूपच शेअरही केली जात आहे.
व्हायरल होत असेल्या व्हिडीओमध्ये एक महिला रिपोर्टने काळ्या रंगाचा एक बुरखा घातला आहे. तसेच तीन पुरूषांना ती काही सवाल करताना पाहायला मिळतं आहे. तसेच त्या या व्हिडीओमध्ये तीन पुरूष असून, त्यांनी झब्बा कुर्ता घातला असल्याचं दिसून येतं आहे.
हा व्हिडीओ डॅविड पत्रीकाराकोश या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला जवळजवळ दीड लाख लोकांनी पाहिलं असून, अनेकांनी याला खूप कमेंट्सही केल्या आहेत.
दरम्यान, मंगळवार 17 ऑगस्ट रोजी कालीबानीनं एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये मागिल 20 वर्षाच्या काळात तालीबान खूप बदललं आहे. पुढं ते असंही म्हणाले की, इस्लामी कायद्यानसूसार महिलांना स्वातंत्र्य असेल. तसेच देशात महिलांना बुर्खा अनिवार्य नसल्याचं संघटनेनं स्पष्टही केलं आहे. परंतू महिलांना हिजाब घालावा लागणार असल्याचंही संघटनेनं स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
नोरा आणि टेरेन्सचा मंचावरच रोमान्स, व्हिडीओ व्हायरल
मुलीच्या लग्नात हातात ग्लास घेऊन अनिल कपूरचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
माझ्या मुलांनी फिल्मस्टार बनू नये; दुसऱ्या मुलाला जन्म देताच करीनाने व्यक्त केली इच्छा
‘ही दोस्ती तुटायची नाय’ म्हणत कॅन्सरच्या उपचारानंतर दोन चिमुकल्यांची पहिली भेट, पाहा व्हिडीओ
राखी सावंतचा ‘स्पायडर मॅन’ डान्स होतोय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा व्हिडीओ