मुंबई | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील एक मोठी बातमी आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे सकारनं बहुमत गमावलं असं मानलं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या (BJP) शिष्टमंडळाने राज्यपालांची काल भेट घेतली होती. त्यामध्ये राज्यपालांनी राज्य सरकारला बहुमत चाचणी घेण्यासाठी पत्र दिलं.
या पत्राचा संदर्भ देत तसेच राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या बातम्यांचा हवाला देत राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवलं आहे.
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती अस्थिर असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय शिवसेनेच्या 39 आमदारांनी घेतल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध होत आहे. यापार्श्वभूमीवर सात अपक्ष आमदारांचा 28 जून रोजी राजभवनला ईमेल आला आहे. त्यामध्ये सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लवकरात लवकर बहूमत चाचणी सिद्ध करणं आवश्यक आहे.
विरोधी पक्षनेत्यांनी 28 जून रोजी माझी भेट घेतली. मला राज्याच्या राजकीय स्थितीची माहिती दिली. त्यांनी पत्रही दिलं असून त्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे बहुमत नसल्याचे मह्टलं आहे.
राजकीय घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहूमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश देण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
मुंबईसह राज्याच्या काही भागात 39 आमदारांविरोधात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आमदारांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवालाही धोका आहे. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर माझं असं मत झालं आहे की, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बहूमत सिध्द करायला हवं.
बहूमत चाचणी प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण करावं. प्रत्येक सदस्याला जागेवर उभं राहण्यास सांगून सदस्य मोजणी करावी, असे निर्देश राज्यपालांनी दिलेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एकनाथ शिंदे अडचणीत, गाड्यांच्या किंमती, शेतजमीन लपवल्याचा आरोप
“किती जणांना काढाल? टाळं लावायला दोघं तरी ठेवा”
महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात अखेर भाजपची उडी, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला
‘तुमचे पुत्र, प्रवक्त्यांनी बाप काढायचा आणि तुम्ही समेटाची हाक द्यायची’, शिंदेंचा घणाघात