कार चोरांना पळवून लावण्यासाठी तरूणाने लढवली मोठी शक्कल, पाहा व्हिडीओ

आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

काही व्हिडीओ तर आपल्याला प्रेरणा देणारे असतात. तर काही कीही व्हिडीओंवर आपल्याला विश्वासही बसत नाही असे असतात. आजकाल सगळीकडे चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. लोक काहीही चोरण्याचा प्रयत्न करतात.

अनेकजण चोरांच्या भितीने आपल्या मौल्यवान वस्तूंची खूप काळजी घेतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरूण पेट्रोल पंपावर आपल्या गाडीत पेट्रोल भरताना दिसत आहे. पेट्रोल भरत असताना अचानक काही वेळानंतर त्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाची मोठी गाडी येते आणि त्या तरूणाच्या गाडीजवळ थांबते.

त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून तीन-चारजण खाली उतरतात आणि त्या तरूणाच्या गाडीजवळ जाऊ लागतात. दोघंजण पुढच्या साईडने जातात. तर उरलेले दोघंजण त्या तरूणाला धरण्यासाठी त्याच्याजवळ जातात. परंतू ती गाडी ज्यावेळी येत होती त्याचवेळी त्या तरूणाला काहीतरी वेगळं असल्याचं जाणवलं होतं.

ते चोर त्याच्या जवळ येऊ लागताच तो आपल्या हातातला पेट्रोलचा पाईप त्यांच्या अंगावर धरतो आणि सगळ्यांना पेट्रोलने अंघोळ घालतो. शिवाय त्या चोरांच्या गाडीवरही तो पेट्रोलचा पाईप धरतो आणि ती गाडी पेट्रोलने भिजवत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतं आहे. त्यानंतर ते सगळे चोर आपली गाडी घेऊन पळून जातात.

त्या तरूणाच्या या युक्तीचे अनेकांनी कौतुक केलं आहे. विशेष म्हणजे यासगळ्यामध्ये न घाबरता,  गोंधळून न जाता त्या तरूणाने शांत डोक्याने लढवलेल्या शक्कलेचे कौतुक करावे तितके कमीच आहे. आपणही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टींकडे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. जेणेकरून वाईट घडणारी घटना आपल्याला टाळता येऊ शकते.

हा व्हिडीओ ‘@RexChapman’ या यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्याने ‘How to deal with car jackers’ असं कॅप्शनही दिलं आहे.

तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत जवळजळ 5 लाख इतक्या लोकांनी पाहिला असून, या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव होत आहे.


महत्वाच्या बातम्या- 

पिसाळलेल्या हात्तीने गपचूप बसलेल्या म्हशीवर केला हल्ला…

समुद्रात शार्कची तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

दिपाली सय्यदचा मुलासोबतचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर होतोय…

‘वडिलच स्वतः सांगतात गडद रंगाची बिकिनी घे…’,…

अरे बापरे! बाळाला जन्म देईपर्यंत महिलेला माहितीच नव्हतं ती…