मॉस्को | रशियाचे उद्योगपती व्लादिमीर पोतानिन यांच्या बायकोने पोटगीसाठी अर्ज केला आहे. यामुळे पोतानिन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण पोतानिन यांच्या कंपनीचा 50 टक्के हिस्सा मिळावा अशी मागणी व्लादिमीर पोतानिन यांनी केली आहे.
व्लादिमीर यांच्या कंपनीची किंमत तब्बल 14 अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास दहा हजार आठशे कोटी रूपये आहे. यातील अर्धा देण्याची मागणी त्यांच्या बायकोने केली आहे.
नतालिया यांच्या बाजूने हा निकाल लागल्यास हा जगातील तिसरा सर्वात महागडा घटस्फोट होऊ शकतो. यापूर्वी अॅमझॉनचे फाऊंडर जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांचा देखील घटस्फोट झाला आहे. जेफ बेझोस यांनी आपल्या पत्नीला घटस्फोटानंतर तब्बल 2.75 लाख कोटी रुपये दिले होते.
हा जगातील सर्वात महागडा घटस्फोट मानण्यात येतो. त्यानंतर नंबर लागतो तो बिल गेट्स यांचा गेट्स यांनी देखील आपल्या पत्नीला कोट्यावधी रुपये दिले होते.
आता जर व्लादिमीर पोतानिन यांच्या बायकोच्या बाजुने निकाल लागल्यास, पोतानिन यांना तब्बल 5400 कोटी रुपये द्यावे लागणार आहे. म्हणजेच हा जेफ बेझोस आणि बिल गेट्स यांच्यानंतर जगातील सर्वात महागडा तिसरा घटस्फोट ठरणार आहे.
दरम्यान, पोतानिन यांचा जगातील काही निवडक श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश होतो. त्यांचा जागतिक श्रीमंतांच्या क्रमवारीमध्ये 55 वा क्रमांक लागतो.
महत्त्वाच्या बातम्या-
10 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; लाखाचे झाले 32लाख
Omicronच्या धोक्यामुळे केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
‘मी पाहिलं तेव्हा बिपीन रावत जिवंत होते…’; प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक खुलासा
“जो घर सोडून पळाला त्याला कुटुंब म्हणजे काय ते कसं समजणार?”
‘मौका सभी को मिलता है…’; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला इशारा