कोरोना काळात आई-वडिलांना गमावलेल्या मुलांसाठी धावून आली ‘ही’ अभिनेत्री

मुंबई| देश सध्या कोरोनाशी मोठी लढाई लढतोय. कोरोनाच्या दुस-या लाटेने महारौद्ररूप धारण केले आहे. अशा स्थितीत देशातील आरोग्यव्यवस्थाही कमी पडत आहे. ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवर इंजेक्शन आणि रुग्णासाठी बेड, या सर्व गोष्टींचा मोठा तुटवडा भारतात निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य प्रशासनावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.

दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे नियमांचं पालन न करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जात आहे. अशा संकट काळात अनेकजण पुढे येऊन मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे.

या व्हायरसमुळे अनेकांनी आपल्या जवळच्या आणि खास लोकांना गमावलं आहे. अनेक लहान मुलांनी तर स्वतःच्या आई-वडिलांना गमावलं आहे. अशा मुलांच्या मदतीला आभिनेत्री करीना कपूर खान धावून आली आहे.

करीना कपूरने चाइल्ड रेस्क्यू हेल्पलाईनची सर्व माहिती तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. पोस्टच्या माध्यमातून करीनाने तिच्या चाहत्यांना आणि नेटकऱ्यांना मदतीसाठी एक पाऊल पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. करीनाने Akancha संस्थेची सर्व माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

करीनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. करीनाच्या या पुढाकारामुळे अनेक मुलांची मदत होईल.

करिनाने कॅप्शनमध्ये ‘माझं मन त्या मुलांसाठी दुःखी होतं, ज्यांनी या महामारीमध्ये त्यांच्या आई-वडिलांना गमावलेलं आहे. त्यामुळे कृपा करून नॅशनल चाईल्ड हेल्पलाईन नंबरवर फोन करून मुलांबद्दल माहिती द्या. आपण त्यांचं दुःख समजू देखील नाही शकतं.’ असं लिहिलं आहे.

दरम्यान, सध्या वेळ कठिण आहे, पण प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून प्रशासनालाही मदत केली पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करणे हीच काळाची गरज बनली आहे. कोरोना लढाईत आपण सगळे एकत्र आहोत असे म्हणत अनेक लोक कोरोना काळात मदत करताना दिसत आहेत.

 

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy