मुंबई | गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे.
यासाठी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नागरिकांसाठी काही निर्बंधही घालून दिले आहेत. त्यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यांसारख्या नियांमाचा समावेश आहे. पंरतू तरीही कोरोना आटोक्यात येत नाहीय. दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतं आहे.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतं आहे. या काळात अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं कळतं आहेत. तसेच एका अभिनेत्रीला एकादा सोडून दोनदा कोरोनाची लागण झाली असल्याची माहीती मिळतं आहे.
अनुपमा या मालिकेती अभिनेत्री पारूल चौधरीला कोरोनाची लागण झाली असून, तिची तब्येत खूप खालवली असल्याचं समजतं आहे. पारूलला सहा महिन्यापूर्वी एका वेबसिरीजचे शूटींग करायचे होते. त्यासाठी तिने आपली कोरोनाची टेस्ट केली असता तिचा रिपोर्ट पोझिटिव्ह आला होता.
मात्र त्यावेळी तिला कोणताही त्रास होत नव्हता. तसेच तिच्या कोणतेच कोरोनाचे लक्षण दिसत नव्हते, असं पारूलने सांगितलं आहे. पण गेल्या काही दिवासांपासून माझं खूप डोकं दुखतं आहे आणि माझं संपूर्ण अंग दुखतं आहे. त्याचबरोबर मला कोणत्याही पदार्थाची चव, तसेच मला कोणताही वास पण येत नसल्याचं पारूलनो सांगितलं.
हे सगळे त्रास मला होत असल्यामुळे माझ्यात कोणत्याच प्रकारचा त्राण राहिलेला नाही. त्यानंतर तिने कोरोनाची टेस्ट केली असता, तिचा रिपोर्ट पोझिटिव्ह आला असून ती तिच्या घरातच क्वॉरंटाईन आहे. तसेच पारूलसोबत तिचे आई-वडील, बहिण यांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचं तिनं सांगितलं.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री कतरिनाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ती सध्या घरी आयसोलेट राहून स्वत: ची काळजी घेत आहे. आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली.
महत्वाच्या बातम्या-
रितेश देशमुखचा ‘हा’ व्हिडीओ होतोय तूफान व्हायरल,…
महिलेनं चक्क मगरीच्या जबड्याजवळ हात नेला अन्…, पाहा…
न्हाव्याने आधी मित्राचे केस कापले अन् त्यानंतरचा प्रकार…