‘या’ अभिनेत्रीनं केली होती कंडोमची पहिली जाहिरात, आजही असते चर्चेत

मुंबई| आई-वडिलांच्या पावलावर पाय ठेवत अनेक मुलं कलाविश्वात पदार्पण करत असतात. यातच ज्येष्ट अभिनेते कबीर बेदी आणि प्रसिद्ध नृत्यांगणा, मॉडेल प्रोतिमा यांची लेक म्हणजे अभिनेत्री पूजा बेदीनंही आई वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत कलाविश्वात पदार्पण केलं होतं. 70 च्या दशकात आपल्या हाॅट अंदाजांनी तिनं चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं.

अभिनेत्री पूजा बेदीनं आपल्या अभिनयासोबत बोल्ड अदांमुळे चाहत्यांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पूजानं अनेक चित्रपट, जाहिरातींमध्ये काम केलं आहे. काही जाहिरातींमुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या जाहिरातींमुळे ती खूप चर्चेतही राहिली.

काही दिवसांपूर्वी पूजानं जुन्या आठवणींना उजाळा देत एक जुन्या जाहिरातीमधील फोटो शेअर केले होते. त्यामुळे ती पुन्ही एकदी चर्चेचा विषय बनत आहे.

पूजाने केलेली कामसूत्रची जाहिरात खूप वादग्रस्त ठरली होती. कामसूत्र कंडोमच्या जाहिरातीत तिच्यासोबत मॉडेल मार्क रॉबिनसन दिसला होता. जाहिरातीला दूरदर्शनवर बॅन करण्यात आलं होतं. बाकीच्या अनेक चॅनल्सनी देखील ही जाहिरात चालवण्यास नकार दिला होता. त्यावेळी तिच्यावर सडकून टीका झाली होती.

त्यावेळी कंडोमची जाहिरात करणारी ती पहिली अभिनेत्री होती. अशाप्रकारची जाहिरात करण्यासाठी कोणतीच अभिनेत्री तयार नव्हती त्यावेळी पूजाने ही जाहिरात करण्याचे धाडस दाखवले होते. आता पूजाचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

पूजा बेदी एक्सट्रा मॅरीटल अफेअर आणि सेक्स या विषयावरील तिच्या बोल्ड विधानांमुळे ओळखली जाते. पूजाला पहिल्या लग्नापासून पूजाला दोन मुले आहेत आलिया आणि ओमर.

‘जो जीता वहीं सिकंदर’ या सिनेमाने पूजाला खरी ओळख मिळवून दिली असली तरीही यानंतर तिचा एकही चित्रपट हिट ठरला नाही. या सिनेमानंतर पूजाने ‘विषकन्या’, ‘लुटेरे’, ‘फिर तेरी कहानी याद आए’, ‘आतंक ही आतंक’ आणि ‘शक्ति’ अशा सिनेमांमध्ये देखील ती दिसली. ‘अनेक बोल्ड सीन, किसींग सीन, कामसुत्रची जाहिरात यामुळे पूजा बेदी प्रसिद्ध झाली होती.

 

महत्वाच्या बातम्या – 

मुलगी दिली नाही म्हणून मुलीच्या आईलाचं पळवलं अन्…..

‘राष्ट्रपती लागवट लागू करा’; म्हणणाऱ्यांवर जयंत…

‘मला किस करशीर का?’ चाहत्याच्या प्रश्नावर…

“न्यायव्यवस्थेचा प्रयत्न करुन सरकारवर दबाव आणण्याचा…

‘थलायवी’साठी कंगनाची मेहनत; वाढवलं तब्बल ‘इतकं’…