पटणा | देशात सगळीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. दररोज हाणामारी, हत्या केल्याच्या घटना घडल्याचं कानावर येतं असतं. यामुळे समाजात हिंसक वातावरण निर्माण होत चालल आहे.
अशातच पटणा येथे रेल्वे स्टेशन मास्टरने आपल्या पत्नीची हत्या करून स्वत:लाही संपवल्याची घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागिल कारण ऐकून सर्वांना धक्काच बसला आहे.
ही घटना पटणामधील पत्रकारनगर पोलीस ठाणे परिसरातील ओम रेसिडेन्सी अपार्टमधील ही घटना आहे. पतीचे नाव अतुल लाल आणि पत्नीचे नाव तुलिका हे आहे. तुलिकाला कोरोना संसर्ग रोगाची लागण झाली असल्यामुळे पती अतुलने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला.
त्यानंतर अतुलने चार मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर नातेवाईकांनी या संपूर्ण घटनेची पत्रकारनगरमधील पोलीस स्टेशनमध्ये याची माहिती दिली असता. तातडीने पोलीस घटना स्थळी दाखल झाले आणि लगेचच तपासाला सरूवात केली.
पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कुमार यांनी सांगितले की, पत्नी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळाल्यापासून पती अस्वस्थ होता. पत्नी पॉझिटिव्ह असल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. तसेच तपासा दरम्यान पती अतुल लाल हे पटणा जंक्शन रेल्वेमध्ये काम करत असल्याचे समोर आलं आहे.
दरम्यान, सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे. तसेच कोरोना रोगाचे विषाणू हवेमार्फत संचार करत असल्यामुळे माणसाला कोरोनाची लगेचच लागण होतं आहे.
महत्वाच्या बातम्या-
सुशांतच्या बहिणीने शेअर केली ‘ती’ शेवटची पोस्ट,…
‘ब्रिटीश हवे होते अजून काही वर्ष…..’…
आणखी एका बाॅलिवूड अभिनेत्रीला कोरोनाची लागण, म्हणाली….
‘कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसांत…
जाणून घ्या! ऑस्कर जिंकणाऱ्याला किती रुपयांचं मानधन मिळतं