मास्कच्या कारवाईसाठी गाडी थांबवली अन् तरुणाने असं काही केलं पोलिसच लागला पळू, पाहा व्हिडीओ

रत्नागिरी | सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा करोनाने डोकं वर काढायला सुुरवात केली आहे.

त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढूू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना काही निर्बंध लागू केले आहेत. ज्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, मास्क घालणे इत्यादी नियमांचा त्यात समावेश आहे.

याच दरम्यान आपण नियम मोडण्याच्या संदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झालेले पाहिले आहेत. परंतू  अशातच यावेळी सोशल मिडीयावर एक अनोखा पद्धतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मास्क न घातल्यामुळे वाहतूक पोलीस एका तरुणावर कारवाई केली. मात्र तरुणाने मास्कबद्दल होणाऱ्या कारवाईचं सत्य सगळ्यासमोर आणलं त्यानंतर पोलिसांनीच तिथून पळ काढला. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरलं होत आहे.

व्हिडीओमध्ये दुचाकीवरुन चाललेल्या एका तरुणाने मास्क न घातल्यामुळे  पोलिसांनी त्याला थांबवलं असल्याचं दिसत आहे. तसेच हा व्हिडीओ तरुणाने त्याच्या फोनमध्ये शूट केला असल्याचं दिसत आहे.

मास्क कुठयं असं पोलिसानी विचरलं असता, हेलमेट असल्यामुळे मास्क घातलं नाही. मास्क माझ्या खिशात आहे , असं उत्तर तरुणाने त्या पोलिसांना दिलं. पंरतू हे सगळ विचारत असताना पोलिसांचा मास्क देखील नाकाच्याखाली होता. त्यावेळी मला त्यांनी कारण दिलं की बोलताना मास्क खाली गेला आणि त्यांना लगेच मास्क वरती  केला. आता तुम्हीच सांगा हा प्रकार योग्य आहे की अयोग्य आहे?, असा प्रश्न त्या तरुणाने विचारला आहे.

हे असंच सुरु आहे. कोणत्याही वाहन चालकाला थांबवायच हेलमेट असूनदेखील मास्क नाही म्हणून त्याच्याकडून फाईन घ्यायचा. सरकराने जे अधिकार यांना दिले आहेत त्याचा हे गैरवापर करत असल्याचं त्या तरुणानी सांगितलं आहे.  रस्त्यावर असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये तुम्ही तपासू शकता, या वाहतूक पोलिसाचा मास्क होता की नाही, यांचं नाव  शिवराम करमगळे आहे.

मी या साहेबांकडे फाईनची पावती मागत आहे. तर हे साहेब मला पावती देणार नाही असं म्हणत आहेत. का देणार नाही पावती?, असं त्या तरुणाने विचारलं तर मला फाईनची पावती नाही द्यायची म्हणून मी पावती देणार नसल्याचं वाहतूक पोलिस म्हणत आहेत.

पोलिसाच्या हातात पावती पुस्तक असतानाही, पावती ऑफिसमध्ये मिळेल असं पोलिस त्या तरुणाला सांगत आहेत. तरुण वारंवार फाईनची पावती मागतं असल्यामुळे पोलिस तिथून पळ काढत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
https://www.facebook.com/377654102969124/videos/192129148939734
महत्वाच्या बातम्या-