भर मांडवात नवरा बायकोची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

मुंबई | सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ येऊ लागले आहेत. अशाच एका व्हिडीओमुळे सध्या खळबळ उडाली आहे.

इन्स्टाग्रामवर only._.sarcasm_ नावाच्या अकाऊंटवरून एक व्हिडीओ अपलोड करण्यात आलाय. मात्र काही वेळातच हा व्हीडिओ लोकांना खूप आवडला. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये स्टेजवर उभ्या असलेल्या नवरा-नवरीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण होतं आणि ते एकमेकांना कानाखाली मारू लागतात.

वधू वराला मिठाई खाऊ घालते पण नवरदेवाचं लक्ष कॅमेराकडे असतं. वधू काही सेकंद थांबते, परंतु जेव्हा वर तिच्याकडे पाहत नाही तेव्हा वधूला राग येतो.

वधूनेही वराला कानाखाली मारली. यानंतर वधू-वर एकमेकांना एका मागोमाग एक कानाखाली मारू लागतात. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक असंही म्हणू लागले आहेत

सोशल मीडियावर लोक हा व्हिडीओ शेअर करत आहेत आणि त्याची खिल्ली उडवत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोलही केलं.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

‘….हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही’; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका 

मोठी बातमी! राज ठाकरेंना झटका, सभेपूर्वी पोलिसांनी उचललं मोठं पाऊल 

“माझ्यावर टीका करणाऱ्या अनेकांना मी खिशात घेऊन फिरतो” 

अखेर Elon Musk यांनी विकत घेतलं ट्विटर, मोजले ‘इतके’ पैसे