फडणवीसांचा मध्यरात्रीचा पोलीस स्टेशनमधील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ; पाहा व्हिडीओ

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात कोणत्या न कोणत्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपाची खेळी चालूच आहे. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांना टार्गेट करण्याचा एकंही मुद्दा सोडत नाहीत. अशातच आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस स्टेशनमधील काल रात्रीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकंच खळबळ उडाली आहे.

ब्रूक फार्माचे राजेश डोकनिया यांना काल बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती भाजप नेत्यांना मिळताच देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार पराग आळवणी आणि आमदार प्रसाद लाड यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजप नेत्यांनी हस्तक्षेप करताच डोकनिया यांना पोलीसांनी रात्री उशिरा सोडलं.

या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला होता. यानंतर पोलीस ठाण्यातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ समोर येताच सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेते पोलीस स्टेशनमध्ये बसले आहेत. इतर काही पोलीस अधिकरी देखील येथे उपस्थित आहेत. यावेळी फडणवीस डोकनिया यांना ताब्यात का घेतलं? याबद्दल पोलिसांना जाब विचारत आहेत.

माहितीनुसार, कोरोनावार रामबाण ठरणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या साठ्याबद्दल चौकशी करण्यासाठी राजेश डोकनिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र, भाजप नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आक्रमक भूमिका घेतली. यामुळे डोकनिया यांना सोडून देण्यात आलं.

पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर फडणवीसांनी पोलीस स्टेशनबाहेर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी केलेली कारवाई योग्य नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला रेमडेसीवीर मिळावी यासाठी सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. अशातच राजेश डोकनिया यांना ताब्यात घेण्याचा प्रकार अतिशय दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून डोकनिया यांना धमक्या देतो आणि संध्याकाळी 10 वाजता पोलीस त्यांना ताब्यात घेतात.

आज पोलीस ठाण्यात आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन मी याबद्दल जाब विचारला आहे. इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल तर फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही, कायद्यानुसार नाही, असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

लज्जास्पद! ‘माझ्या आईला वाचवा डॉक्टर’; मुलांच्या आर्त हाकेनंतरही डॉक्टरनं उपचार नाही केला; व्हिडीओ व्हायरल

भर रस्त्यात चालू कारमधून बाळ खाली पडलं, आई मात्र गाडी चालवत पुढे गेली अन् मग…; पाहा व्हिडीओ

‘द कपिल शर्मा शो’मधील अभिनेत्रीनं केला साखरपूडा, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात भिक मागावी लागते याला…

‘दोस्ताना 2’च्या वादानंतर करण जोहरनं सोशल मीडियावरुन…