मुख्यध्यापकाच्या ऑफिसमध्ये राडा, बोलता बोलता झालं असं की…; पाहा व्हिडीओ

भोपाळ | सोशल मीडियाच्या माध्यमातून दररोज सातत्यानं काही तरी व्हायरल होत असतं. चांगल्या आणि वाईट दोन्हीं बाजुंनी माहिती सोशल मीडियावर व्हायरल होतं असते.

सध्या मध्य प्रदेशमधील सरकारी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मारहाणीचा व्हिडीओ जोरात व्हायरल होत आहे. शिक्षणाच्या मंदिरातच अशाप्रकारची घटना घडल्यानं सध्या ही घटना चर्चेत आहे.

सरकारी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकपदावर कार्यरत असणाऱ्या सरांनी चक्का मुख्याध्यापकाला त्यांच्यात दालनात मारहाण केल्यानं सर चर्चेत आहेत.

कोरोना काळात स्टाफ कमी असल्यानं या दोघांची चर्चा चालू असताना आणि हाणामारी होत असताना पहिल्यांदा कोणी दिसत नाहीत. आवाज जास्त ऐकू येताच बाहेरील व्यक्ती पळत मध्ये येवून हे भांडण सोडवतात.

उजैन जिल्ह्यातील घटिया तहसिल कार्यालयाच्या भागात असणाऱ्या स्वर्गीय नागुलाल मालविय महाविद्यालयात ही घटना घडली आहे. मुख्याध्यापक आणि प्राध्यापकात पहिल्यांदा थोडी शाब्दिक बाचाबाची झाली होती.

प्राध्यापकाचं नाव ब्रम्हदिप आलुने तर मुख्याध्यापकाचं नाव डाॅक्टर शेखर मेदमवार आहे. मारहाणीचा हा व्हिडीओ सध्या देशभर पसरला असून सर्वस्तरातून या घटनेची निंदा केली जात आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल  झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडीओत प्राध्यापक मुख्याध्यापकाच्या टेबलवरील प्रत्येक वस्तू फेकून मुख्याध्यापकाला मारतो.

दरम्यान, या व्हायरल व्हिडीओनंतर सर्वत्र सध्या प्राध्यापक आणि मुख्याध्यापकाची चर्चा आहे. अंतर्गत वादानंतर असा थेट मारामारीचा प्रसंग आल्याची चर्चा उजैनमध्ये आहे.

पाहा व्हिडीओ –

महत्त्वाच्या बातम्या – 

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने… 

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला! 

रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का; कर्जत नगरपंचायतीवर मिळवली एकहाती सत्ता 

वरूण धवनला मोठा धक्का; जवळच्या व्यक्तीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन